राष्ट्रवादीचा आपल्या सभापतीविरोधातील अविश्वास ठरावास पाठिंबा

हजावानी यांच्यावर मुजीब रुमाणे यांनी तोफ डागली आहे.
No-confidence motion against Dapoli Panchayat Samiti chairperson
No-confidence motion against Dapoli Panchayat Samiti chairperson

दाभोळ (जि. रत्नागिरी) : दापोली पंचायत समितीचे सभापती रऊफ हजवानी यांच्यावर अविश्‍वासाचा ठराव शिवसेनेच्या सदस्यांनी आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे प्रवक्‍ते मुजीब रुमाणे यांनी दापोलीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सभापती रऊफ हजवानी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असून त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड उभारले आहे. त्यामुळे हजावानी यांच्यावर मुजीब रुमाणे यांनी तोफ डागली आहे.

गतवर्षी कोरोना काळात तालुक्‍यात अनेक ठिकाणी गावबंदी असतानाही आणि कडक लॉकडाऊनही पाळला जात होता. त्यावेळी सर्व पंचायत समिती सभापतींच्या गाड्या प्रशासनाकडे जमा करण्यात आल्या होत्या. मात्र, दापोलीचे सभापती हजवानी यांनी त्या काळात गावभेटीचे दौरे केले होते. हजारो रुपयांचे डिझेल वापरल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आल्याचे रुमाणे यांनी सांगितले.

सभापती हजवानी हे आता शिवसेनेच्या वळचणीला गेले असून हे सभापती हर्णै जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस हद्दपार करण्याचा गमजा मारत आहेत, त्यांना आपल्या मुलीला ग्रामपंचायत निवडणुकीत निवडूनही आणता आले नसल्याचा टोला रुमाणे यांनी या वेळी बोलताना लगावला. हजवानी हे पंचायत समितीमधील काळे धंदे बाहेर काढू, असे सांगत फिरत आहेत. मात्र, पदावरून पायउतार व्हावे लागत असल्याने त्यांची तडफड सुरू असल्याचे रुमाणे यांनी सांगितले. 

दरम्यान, सभापती हजनावी यांच्यावरील अविश्‍वासाच्या ठरावावर येत्या 16 एप्रिलला मतदान होणार असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.


हेही वाचा : तुम्ही मला एक आमदार द्या; मी ह्यांचा कार्यक्रमच करतो 

पंढरपूर : ‘‘पंढरपूरच्या पोटनिवडणकीत तुम्ही महाविकास आघाडीचा कार्यक्रम करा; मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. समाधान आवताडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिला, त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केलाच म्हणून समजा,’’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलावर पुन्हा एकदा भाष्य केले.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारनिमित्त पंढरपुरात सोमवारी (ता. १२ एप्रिल) देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यात त्यांनी वरील भाष्य केले.

ही निवडणूक एका मतदारसंघापुरती असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे. एका मतदारसंघातील निवडणूक जिंकली काय आणि हारले काय. त्याने काय फरक पडणार आहे. याने सरकार थोड बदलते. त्यावर मी त्यांना सांगितले की सरकार बदलायचे असेल तर आम्हाला निवडणुकीची गरज नाही. जेव्हा बदलायचे असेल, तेव्हा सरकारही बदलून दाखवू, अशा शब्दांत फडणवीस यांनी आव्हान दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com