गडकरींकडे नेतृत्व द्या : स्वामीनंतर महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजप नेत्याची मागणी 

सध्या ते नागपुरात अडकले आहेत.
Nitin Gadkari should be given the lead to handle Kovid's situation : Neeta Kelkar
Nitin Gadkari should be given the lead to handle Kovid's situation : Neeta Kelkar

सांगली : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्याची स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे नेतृत्व द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subrahmanyam Swami)यांनी केली होती. त्या मागणीला आता महाराष्ट्र भाजपमधूनही पाठिंबा मिळत आहे. भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्या आणि ज्येष्ठ महिला नेत्या नीता केळकर (Neeta Kelkar) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्यातील भाजप वर्तुळात मात्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. (Nitin Gadkari should be given the lead to handle Kovid's situation : Neeta Kelkar)


नीता केळकर यांनी हे ट्विट पक्षाच्या वेबपेजबरोबरच सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल भातखळकर यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांनाही टॅग केले आहे. ट्विटमध्ये केळकर यांनी म्हटले आहे की, कोवीडचा सामना करण्यासाठी आरोग्यसेवेशी निगडीत सर्व सूत्रे ही नितीन गडकरींच्या कडे द्यावीत, या सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपण आहात का? कमेंट करा, शेअर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याबाबत नीता केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या,‘‘देशावर मोठी आपत्ती आली आहे. अशा काळात गडकरी यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा पक्षाने पुरेपूर उपयोग केला पाहिजे. सध्या ते नागपुरात अडकले आहेत. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. ते ही परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकतात. माझ्या या मागणीवर भाजपचे राज्यातील ९९ टक्के लोक सहमत आहेत. पक्षात असा विचारप्रवाह आहे. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे पक्षाच्या बैठकींचे व्यासपीठ खुले नसल्याने मी या मागणीसाठी समाज माध्यमांचा आधार घेतला आहे.’’

नीता केळकर या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नेत्या आहेत. पक्षाची धुरा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्याकडे असतानाच्या काळात केळकर यांच्याकडे राज्य महिला आघाडीची धुरा होती.पक्षाच्या सुरवातीच्या पडत्या काळात त्यांनी सांगलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अगदी अलीकडची ओळख म्हणजे पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट त्यांचे व्याही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com