आयुष्यात कधीच रडलो नाही; पण त्या दिवशी डोळ्यात पाणी आले 

या सर्वांचे सहकार्याबद्दल आभार.
Never cried in life; But tears came to my eyes that day
Never cried in life; But tears came to my eyes that day

श्रीवर्धन (जि. रायगड) : "जीवनात मी अनेक संकटे पहिली. सुख-दुःख अनुभवले आहे. मी आयुष्यात कधीच रडलो नव्हतो. जून महिन्यात आलेले चक्रीवादळ मी मुंबईत असल्यामुळे वाहिन्यांवर पाहत होतो. गेल्या काही वर्षांपासून मी श्रीवर्धन पाहतोय; पण सहा जून रोजी पाहिलेले श्रीवर्धन पाहून डोळ्यात अश्रू आले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. 

श्रीवर्धनमधील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या सभेत खासदार तटकरे बोलत होते. या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, नगरसेवक अनंत गुरव, वसंत यादव प्रगती आडवडे आदी उपस्थित होते. 

खासदार तटकरे म्हणाले, "पुन्हा एकदा श्रीवर्धनच गतवैभव पुनर्प्रस्थापित करण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांची मदत झाली. या सर्वांचे सहकार्याबद्दल आभार.'' 

"गेली बारा वर्षे या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कशाप्रकारे विकास करता येईल याला प्राधान्य दिले. श्रीवर्धनवासीयांनी वेळोवेळी आमच्यावर विश्वास दाखवला; म्हणून टप्याटप्याने विकास साधता आला. आज श्रीवर्धनवासीयांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान हीच आमच्या कामाची पोचपावती आहे,'' असे सुनील तटकरे यांनी नमूद केले. 

श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे मंदिराचे रखडलेले काम अडचणी दूर करून पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

अजितदादांनी बारामतीची टीम नदीसंवर्धन प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी पाठवली 

रोह्यातील कुंडलिका नदीसंवर्धन प्रकल्प पाहून ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांनी कौतुकाची थाप दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील या कामाची दखल घेत बारामतीमधून नदी संवर्धन प्रकल्प पाहण्यास टीम पाठवली. आपण केलेला नदी संवर्धन प्रकल्प पाहून त्यापद्धतीने बारामतीत काम करण्याचा मानस अजितदादा यांचा आहे. याचे श्रेय पालकमंत्री आदिती तटकरे यांना देताना पहिले "बाप से बेटा सवाई' अशी म्हण होती; परंतु आपल्याकडे आता "बाप से बेटी सवाई' अशी परिस्थिती आहे,'' अशा शब्दांत खासदार तटकरे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले. 

पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ""कोरोनामुळे श्रीवर्धनमध्ये कार्यक्रम घेता आले नाहीत. मात्र, श्रीवर्धनला पर्यटनाचा "ब' दर्जा दिल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येक पाखाडी पाखडीत विकासकाम करणार आहे. श्रीवर्धन वासीयांच्या स्वप्नातील विकास खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केला जाणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com