राज ठाकरेंच्या भूमिकेचे राष्ट्रवादीने केले स्वागत 

त्यावेळी बेरोजगार तरुणांच्या बाजूने उभे राहिलो, हे काळाने आज दाखवून दिले आहे.
 NCP welcomes Raj Thackeray's role
NCP welcomes Raj Thackeray's role

सावंतवाडी : नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर रत्नागिरी येथे व्हायला हवा, त्यामुळे बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे. 

याबाबत पत्रकारांशी बोलताना बबन साळगावकर यांनी वरील मत मांडले. ते म्हणाले की, "सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ग्रीन रिफायनरीचे समर्थन आम्ही केले होते. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनीही समर्थन केले. त्यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या मोठ्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागले होते.'' 

"सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामधील तरुणांना नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच हैदराबाद, गोवा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. काही तरुण परप्रांतामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेले. त्या तरुणांच्या आई-वडिलांना एकटेपणाने जीवन जगावे लागत आहे. अशी भूमिका मांडून मी ग्रीन रिफायनरीचे समर्थन केले होते,'' असा दावा साळगावकर यांनी केला. 

ते म्हणाले की त्या काळामध्येही समर्थन केल्यानंतर पोटाच्या बेंबीपासून ओरडून विरोध करणारे स्वाभिमानी आता ग्रीन रिफायनरीचे समर्थन करत आहेत. दूरदृष्टी ठेवून त्याचवेळी ग्रीन रिफायनरीला समर्थन दिले असते तर ग्रीन रिफायनरीचे 20 टक्के काम होऊ शकले असते. स्वाभिमानी आज समर्थन करतातच आहेत. तसेच, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. त्यावेळी बेरोजगार तरुणांच्या बाजूने उभे राहिलो, हे काळाने आज दाखवून दिले आहे. पुन्हा एकदा मी राज ठाकरे यांचे भूमिकेचे स्वागत करून सरकारने सकारात्मक पावले उचलून ग्रीन रिफायनरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com