राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी शब्द पाळला  

कोकरे गणाच्या सदस्या समिक्षा घडशी यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले होते.
NCP MLA Shekhar Nikam kept his word
NCP MLA Shekhar Nikam kept his word

चिपळूण ः चिपळूण पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चिपळूण पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतिपदी बौद्ध समाजाला सधी मिळाली आहे. आमदार शेखर निकम यांनी रिया कांबळे यांना सभापतिपदासाठी दिलेला शब्द पाळला आहे.

शिवसेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांनी राजीनामा दिल्याने आज (ता. १ एप्रिल) सभापतिपदासाठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी काम पाहिले. सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रिया कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. 

सभापती निवडीपूर्वी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका झाल्या. राष्ट्रवादीच्या बैठकीत रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कोकरे गणाच्या सदस्या समिक्षा घडशी यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यावर आमदार निकम व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून कांबळे यांचे नाव निश्‍चित केले.

शिवसेनेच्या बैठकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना सदस्यांना दिल्या होत्या. त्यामुळे रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे प्रताप शिंदे, माजी सभापती शौकत मुकादम, गटनेते नंदकुमार शिंर्के, राकेश शिंदे, माजी सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.


..हा तर समाजाचा गौरव

सभापतिपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव होते. पंचायत समितीच्या इतिहासात सभापतिपदी बौद्ध समाजाला संधी मिळाली नव्हती. रिया कांबळे यांच्या रूपाने चिपळूण तालुक्‍यात प्रथमच बौद्ध समाजाला सभापतिपदाची संधी मिळाली. हा समाजाचा गौरव असल्याचे मत विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com