रामदास कदमांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा

स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसात सर्व नियम पायदळी तुडवून चारपट गर्दी करणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी महिलांची माफी न मागितल्यास राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल
Nationalist Congress aggressive against Ramdas Kadam; Warning of agitation if not apologized
Nationalist Congress aggressive against Ramdas Kadam; Warning of agitation if not apologized

रत्नागिरी : स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसात सर्व नियम पायदळी तुडवून चारपट गर्दी करणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी महिलांची माफी न मागितल्यास राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खेड शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पूजा तलाठी यांनी दिला आहे.

मनसे महिला आघाडी आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची महिला आघाडी आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहेत. खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत दुपारी आणि सायंकाळी कोणत्या अवस्थेत असतात, अशा प्रकारची शेरेबाजी केल्याने खेडमधील महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही शेरेबाजी म्हणजे महिलांचा अपमान आहे, असे महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजा तलाठी यांनी म्हटले आहे. 

एक महिला म्हणून आम्ही या शेरेबाजीचा महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध करतो. सुवर्णा पत्की यांना खेडमध्ये दोन वर्षे झाली आहेत. या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसला असून या दोन वर्षात कोणत्याही जातीय, धार्मिक दंगलीची घटना येथे घडलेली नाही. दोन्ही धर्मियांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. कोविड काळातही त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, हे सर्वांनी पाहिले आहे, असे तलाठी यांनी म्हटले आहे.

गरजवंतांना धान्याचे कीट वाटप त्यांनी केल्याचे खेडवासियांनी पाहिले आहे. त्यांचा खरे तर सन्मान होणे आवश्‍यक होते. परंतु माजी मंत्री रामदास कदमांनी त्यांच्याबाबत अयोग्य भाषा वापरली. हे खूप संतापजनक आहे. त्यामुळे आघाडीतर्फे पोलिस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे, असे पूजा तलाठी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com