उदय सामंतांनी केलेल्या घोषणा त्यांच्या शरीरावर लिहून ठेवा  ः नीतेश राणे

उदय सामंत यांना गजनी सिनेमातील हिरोसारखा विसरण्याचा रोग (गजनी रोग) झाला आहे.
MLA Nitesh Rane criticizes Guardian Minister Uday Samant over Sarpanch's insurance cover
MLA Nitesh Rane criticizes Guardian Minister Uday Samant over Sarpanch's insurance cover

सिंधुदुर्ग  ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सरपंचांना विम्याचे संरक्षण देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, त्याबाबतचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी सामंत याचा समाचार घेतला आहे. ‘‘पालकमंत्री सामंत हे तावातावाने अनेक घोषणा करतात. मात्र, आपण काय घोषणा केल्या होत्या, हे नंतर त्यांनाच कळत नाही. त्यामुळे पुढच्यावेळी त्यांच्या शरीरावर लिहून ठेवा, जेणेकरून वर्षभरामध्ये ते काय बोलले आहेत, हे त्यांच्या आठवणीत राहील,’’ असा टोला राणे यांनी पालकमंत्री सामंत यांना लगावला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना विम्याचे संरक्षण देण्यात येईल, असे जाहीर केले हेाते. मात्र, त्याची अमंलबजावणी अजूनही झालेली नाही. त्यामुळे राणे यांनी सामंत यांच्यावर टीका केली आहे. आमदार राणे म्हणाले की उदय सामंत यांना गजनी सिनेमातील हिरोसारखा विसरण्याचा रोग (गजनी रोग) झाला आहे. पालकमंत्री तावातावाने अनेक घोषणा करतात. मात्र, नंतर त्यांनाच कळत नाही की आपण काय घोषणा केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी ते जेव्हा घोषणा करतील, तेव्हा त्यांच्या शरीरावर लिहून ठेवा. ज्यामुळे वर्षभरात ते काय बोलले आहेत, हे त्यांच्या आठवणीत राहील. 

अनेक भागातील नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील गावोगावचे सरपंच जीव धोक्यात घालून कोरोनाविरोधातील लढाईत काम करत आहेत. या लढाईत खर्चासाठी  ते स्वतःच्या खिशात हात घालत आहेत. मात्र, त्यांच्याबद्धल कोणीही विचार करताना दिसत नाही. सरपंचांचा पन्नास हजारांचा विमा उतरवणार म्हणून मंत्री घोषणा करणार आणि तुम्ही हेडलाईन करणार. पण विमा उतरवणार कधी? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

जंबो कोविड सेंटरचं जे झालं, तसाच हा सरपंचांच्या विमा संरक्षणाचा विषय आहे. गावोगावचे सरपंच जर जनतेचं संरक्षण करत असतील, तर सरपंचांचं संरक्षण कोण करणार?पालकमंत्री सामंत हे सातत्याने बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. पिक्चरचा डायलॉग मारतात, तसा डायलॉग मारला, तर लोक टाळ्या वाजवतील, असं पालकमंत्री उदय सामंत यांना वाटतंय. पण, हा पिक्चर नाही तर ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आमच्या आयुष्याशी खेळत आहात. सरपंचांना संरक्षण देणार नसेल तर भारतीय जनता पक्ष माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोचवेन, असेही राणे या वेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com