भास्कर जाधवांचा महाविकास आघाडीने वापर करून घेतला

आता भास्कर जाधवांना काही मिळेल, असंदिसत नाही.
Mahavikas Aghadi used Bhaskar Jadhav : Ashish Shelar
Mahavikas Aghadi used Bhaskar Jadhav : Ashish Shelar

मुंबई  ः विधानसभेचे अध्यक्ष कोणाला करावे, हा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा प्रश्न आहे. आमदार भास्कर जाधवांना अध्यक्ष करायला शिवसेनेचं समर्थन आहे का? हे मला माहिती नाही. भास्कर जाधव यांचा जेवढा उपयोग करायचा होता, तेवढा या तीन पक्षांनी केला आहे. त्यामुळे आता भास्कर जाधवांना काही मिळेल, असं कोणत्याही राजकीयदृष्या शहाण्या माणसाला दिसत नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्या विधानसभा अध्यक्षपदाबाबतच्या चर्चेवर भाष्य केले. (Mahavikas Aghadi used Bhaskar Jadhav : Ashish Shelar)

आशिष शेलार ह्यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्षपदाबाबतच्या चर्चेवर आपले मत मांडले. विधानसभेतील गोंधळ आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ आमदारांमध्ये शेलार यांचा समावेश आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांचा उपयोग करून घेतला, असा अप्रत्यक्ष आरोप त्यांन महाविकास आघाडीवर या वेळी बोलताना केला.

ओबीसी आरक्षणासंदर्भात शेलार म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार दमदार पाऊले टाकत आहे, असे काही दिसत नाही. राज्य सरकार नेमकं काय करतंय? यावर आमचं लक्ष आहे.

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर ‘भारतीय जनता पक्षात कोणीही नाराज नाही,’ असा दावा शेलार यांनी केला. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी मांडलेली भूमिका ही प्रत्येक कार्यकर्त्याला पटणारी आहे. भाजपत कोणतीही नाराजी नाही. मंत्रीपदाचा विषय उगाचच पुढे वाढवला जात आहे. 

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होणार, याबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकावर टीका केली. ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस झाले आहेत, ज्यांना कोरोना होऊन गेलाय, अशा नागरिकांना लोकल वापरू न देणे, हा अन्याय आहे. कोरोनाची परिस्थितसंदर्भात शास्त्रीय भूमिका घेऊन सर्वसामान्या नागरिकांना लोकल उपलब्ध करुन द्यावीच लागेल.

न्यायाधीश आणि सरकारी वकिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण, खासगी वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी नाही? हा काय प्रकार आहे? राज्य सरकारचा हा सगळा उलटा कारोबार सुरू आहे. याचं स्पष्टीकरण राज्य सरकारला द्यावं लागेल, असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com