नारायण राणेंना पंतप्रधान केले तरी शिवसेनेला कोकणातून हटविणे अशक्य

पराभव काय असतो, ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणे यांना दाखवून दिले आहे.
If Narayan Rane is made the Prime Minister, it is impossible to remove Shiv Sena from Konkan : Vinayak Raut
If Narayan Rane is made the Prime Minister, it is impossible to remove Shiv Sena from Konkan : Vinayak Raut

रत्नागिरी  ः कोकण आणि शिवसेनेचे नातं अभेद्य आहे. नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरीसुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. (If Narayan Rane is made the Prime Minister, it is impossible to remove Shiv Sena from Konkan : Vinayak Raut)

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार बुधवारी (ता. 7 जुलै) झाला. महाराष्ट्रातून चार जणांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली असली तरी महाराष्ट्रातीलच दोन जणांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

याबाबत रत्नागिरीत पत्रकारांबरोबर बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात, हेच मोठे दुःख आहे. ते मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो, याचे शल्य फार मोठे आहे. तसेच, महाराष्ट्राला मंत्रीपद देत असताना अन्याय झाला आहे. शिवसेनेशी लढण्यासाठी ज्यांची ताकद नाही, अशांनी एखाद्या नारायण राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचा ठरवले असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. पराभव काय असतो, ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणे यांना दाखवून दिले आहे, असे सांगत खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई आणि शिवसेनेचे नाते अभेद्य 
 
मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात आलं का, यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, मुंबई महालापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण, मुंबई आणि शिवसेना यांचे जे नाते आहे, ते अभेद्य नाते मागच्या 30 वर्षांपासून आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नाही, असा टोला त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com