...तर राज्यपालांबाबत असे शब्द जाणार नाहीत : मुश्रीफांकडून ठाकूरांची पाठराखण 

त्यामुळे सत्तारूढ आणि राज्यपाल असा वाद तयार होतो.
Governor should act according to the constitution : Hasan Mushrif
Governor should act according to the constitution : Hasan Mushrif

कोल्हापूर : राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपालपदी योग्य व्यक्ती बसली नाही, असे चुकून बोलल्या असतील. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे संकेत सातत्याने पाळले जात नाहीत. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नावे देवून अनेक दिवस झाले, तरीही यावर निर्णय नाही, त्यामुळे सत्तारूढ आणि राज्यपाल असा वाद तयार होतो. घटनेनुसार काम केले, तर असे शब्द जाणार नाहीत, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यशोमती ठाकूर यांची पाठराखण केली. 

मुश्रीफ म्हणाले, "वास्तविक राज्यपालांना त्यांचे पद मिळाले आहे. त्यांना त्यांचा मानसन्मान मिळाला. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियार यांनीही घटनेनुसार काम केले तर त्यांच्याबद्दल असे शब्द जाणार नाहीत.'' 

पेट्रोल दरवाढीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शतक ठोकले आहे. पेट्रोल शंभरी पार करेल, अशी परिस्थिती आहे. डिझेल आणि गॅस दरातही प्रचंड वाढ केली आहे. यामुळे शिवसेनेने राज्यभर आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीसुद्धा इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. इंधन दरवाढीबद्दल बोलण्यासाठी भाजपकडे कोणत्याही मुद्दा नाही. त्यामुळेच ते वीज दरवाढीचे आंदोलन करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार हे यावर तोडगा काढतील. ज्या-ज्या वेळी असे प्रश्‍न तयार होता. त्या-त्यावेळी मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी पुढे असते. त्यामुळे यावरही निर्णय लवकरच होईल. असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील 14 हजार ग्रामपंचायतीचे निवडणुकांचे आरक्षण काढले आहे. सध्या जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, त्यामुळे आरक्षण नंतर काढले. दुसऱ्या टप्प्यात कमी ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे आरक्षणाचा काहीही प्रश्‍न येणार नाही. 


मी  जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष होणार नाही 

ग्रामविकास मंत्री म्हणून किंवा इतर महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (केडीसी) निवडणूक मार्चनंतर होईल. यामध्ये मी फक्त संचालक असेन, पण अध्यक्ष नसणार आहे, अशी घोषणा यापूर्वीही केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com