अनिल परबांनी तेच प्रयत्न रत्नागिरीसाठी केले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते - Former MP Nilesh Rane criticizes Ratnagiri Guardian Minister Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परबांनी तेच प्रयत्न रत्नागिरीसाठी केले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार आणि खासदारांनी सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अनाथ असल्यासारखा पालकमंत्र्यांची तीन-तीन महिने वाट बघतात. पण, पालकमंत्री मुंबईत स्वतःचे 1000 फुटाचे अनधिकृत ऑफिस वाचवण्यासाठी मंत्रिपद वापरत आहेत. जी जिद्द स्वतचं ऑफिस वाचविण्यासाठी वापरली, ती रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते, असे खडे बोल भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सुनावले आहेत.

रत्नागिरी जिल्हा दिवाळखोरीत गेला आहे. तिकडे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात झपाट्याने विकासकामे होत आहेत. जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढत असताना शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार आणि खासदारांनी सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजन, बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाहीत, एवढी भयंकर परिस्थिती असताना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी झोपी गेले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हे देखील जिल्ह्याला माहिती नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ऑक्‍सिजन टॅंकर आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नाहीत, तर हे शिवसेनेचे मंत्री जिल्ह्यातील विकासकामे काय करणार. आज जिल्हा मृत्यूच्या दाढेत असताना कोरोना होईल म्हणून शिवसेनेचे मंत्री मतदारसंघात फिरकतानाही दिसत नाहीत.

रत्नागिरीचे  पालकमंत्री अनिल परब हे मुंबईत बसून मंत्रिपदाचा वापर करत आहेत. जिल्ह्यात जनतेच्या हितासाठी कवडीची देखील मदत करताना दिसत नाहीत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात जावे लागत आहे. जिल्ह्यात ऑक्‍सिजनची कमतरता भासत असताना आठ महिने झाले तरी जिल्हा रुग्णालयातील ऑक्‍सिजन प्लॅन्टला मुहूर्तच मिळालेला नाही. अनिल परब अनधिकृत ऑफिस वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तोच प्रयत्न रत्नागिरी जिल्हावासीयांसाठी केला असता तर अनेकांचे जीव वाचले असते, असे परखड मत नीलेश राणे यांनी ट्‌विटच्या माध्यमातून मांडले आहे.

धक्कादायक : पतीचा विरारच्या आगीत मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीनेही सोडले प्राण 
 

विरार : विरार येथील विजय वलभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या १४ कोरोना रुग्णांचा शुक्रवारी (ता. २३ एप्रिल) पहाटे होरपळून मृत्यू झाला. या आगीत पतीचा मृत्य झाल्याचे समजताच कोरोनाबाधित असलेल्या पत्नीस ह्‌दयविकाचा झटका आणि त्यातच त्यांनी आपले प्राण सोडले. 

विजय वल्लभ रुग्णालयातील वातानुकूलीत यंत्रणेचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहेत. त्या आगीत उपचार घेणाऱ्या अतिदक्षता विभागतील कोविडच्या १७ रुग्णांपैकी १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कुमार दोशी हेही उपचार घेत होते. या आगीत त्यांचाही मृत्यू झाला. ही गोष्ट त्यांच्या पत्नी चांदणी दोशी यांना समजताच त्यांना ह्‌दयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चांदणी दोशी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्या विरार शहरातील जीवदानी रुग्णालयात उपचार घेत होत्या. दोशी परिवारावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख