आजी - माजी नगरसेवकांनी केले कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार

त्याला रुग्णालयापर्यंत उपचारासाठी नेण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.
Existing and former corporators performed funerals on the corona infected deadbody
Existing and former corporators performed funerals on the corona infected deadbody

राजापूर  ः कोरोनाच्या (corona) काळात रक्‍ताच्या नात्यामधील व्यक्‍तीही कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी घाबरतात. मृत व्यक्‍तीच्या अंत्यसंस्कारासाठी देखील कोणी समोर येत नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र, सध्याच्या अशा कठीण काळात राजापुरातील दोन आजी-माजी नगरसेवक असलेल्या विनय गुरव (Vinay Gurav) व विजय गुरव (Vijay Gurav) यांनी एका कोरोनाबाधित रुग्णाला आधी पीपीई कीट घालून ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचे निधन झाल्याने पीपीई कीट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. (Existing and former corporators performed funerals on the corona infected deadbody)

राजापूर शहरातील एसटी आगारानजीकच्या गुरववाडी भागात सध्या घाऊक 20 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. मात्र, तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी या भागातील एका 55 वर्षीय नागरिकाला चार दिवस कोरोनाच्या लक्षणांनी ग्रासले होते. घरापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत उपचारासाठी त्याला नेण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.

अखेर विनय गुरव व विजय गुरव या आजी-माजी नगरसेवकांनी धारिष्ट्य दाखवत पीपीई कीट परिधान करून त्या रुग्णाला एका रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर गुरव यांनी नदीकिनारी जात पीपीई कीट जाळून टाकले व रिक्षा सॅनिटाईज करीत तिथेच स्नान केले.

या दरम्यानच ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आला आणि त्याचे निधनही झाले. ग्रामीण रुग्णालयातून याबाबत गुरव यांना दूरध्वनी आला. आता प्रश्‍न होता मृतदेह ताब्यात घेण्याचा. मात्र, त्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नव्हते. त्यातच मृतदेहाचे सोपस्कार करून मृतदेह देण्यासाठी रुग्णालयात एकच कर्मचारी असल्याने पुन्हा या दोन्ही आजी-माजी नगरसेवकांनी पीपीई कीट चढवले आणि मृतदेह बांधून घेत रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन अंत्यसंस्कार केले.

विनय गुरव व विजय गुरव या आजी माजी नगरसेवकांच्या या सामाजिक कार्याबद्दल राजापूर शहरवासीयांतून कृतज्ञता व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com