...एवढे करूनही काही असंतुष्ट आत्मे ठाकरेंवर टीका करतात - Environment Minister Aditya Thackeray will provide ventilators to every district : Uday Samant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

...एवढे करूनही काही असंतुष्ट आत्मे ठाकरेंवर टीका करतात

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षात एकाही टिकेला प्रतिउत्तर दिलेले नाही.

इस्लामपूर : दीड वर्षे कोरोनाच्या संकटात असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्व स्वीकारून कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाचे रुग्ण व्हेंटिलेटरअभावी दगावू नयेत; म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Environment Minister Aditya Thackeray will provide ventilators to every district : Uday Samant)

इस्लामपूर (जि. सांगली) येथील शिवसेना कार्यालयात व्हेंटिलेटर प्रदान कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यासाठी २० व्हेंटिलेटरचे वाटप होणार आहे. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, विभागीय अधिकारी यांनी व्हेंटिलेटर वाटपानंतर सुस्थितीत आहे की नाहीत, त्याचा योग्य वापर होतो का, याची जबाबदारी घ्यावी.

हेही वाचा : सर्वपक्षीय नेत्यांना शिक्रापुरी झटका दाखविणारे पहिलवान बांदल पोलिसी खाक्याने चितपट 

ठाकरे सरकार ८० टक्के समाजकारण, व २० टक्के राजकारण करते आहे, हे जनतेच्या हिताचे आहे. एवढे करूनही काही असंतुष्ट आत्मे ठाकरे सरकारवर टीका करतात. मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षात एकाही टिकेला प्रतिउत्तर दिलेले नाही. तर त्यांनी केलेल्या कृतीतून त्यांना उत्तर दिले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचा डेथ रेट कमी व रिकव्हरी रेट जास्त आहे. ही उल्लेखनीय बाबा आहे. डॉक्टरांच्या पाठीशी नेहमी शिवसेना उभी आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. ती इस्लामपूर शहरापर्यंत पोहोचू शकणार नाही, याकरिता सर्वांनी काळजी घेऊ या, असे आवाहनही सामंत यांनी या वेळी बोलताना केले. 

उपजिल्हा रुग्णालय, आधार हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल इस्लामपूर यांना उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्येकी एक व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आला.

या वेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, सहायक तहसीलदार दीक्षांत देशपांडे, डॉ नरसिंह देशमुख, डॉ रानोजी शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, दी. बा. पाटील, सागर मालगुंडे, नगरसेवक आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख