देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचे राजकीय पंख पूर्णपणे छाटून टाकले

जे जे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते, त्या सर्वांना राजकीय जीवनातून उद्‌ध्वस्त करण्याचे काम फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे.
Devendra Fadnavis completely cut off Pankaja Munde's wings : Vinayak Raut
Devendra Fadnavis completely cut off Pankaja Munde's wings : Vinayak Raut

सिंधुदुर्ग : (स्व.) गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय हे ओबीसी समाज आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांसाठी आधारवड होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजांचे राजकीय पंख पूर्णपणे छाटून टाकले. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राजकारणातून बाद करून टाकले. जे जे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते, त्या सर्वांना राजकीय जीवनातून उद्‌ध्वस्त करण्याचे काम फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केला. (Devendra Fadnavis completely cut off Pankaja Munde's wings : Vinayak Raut)

केंद्रीय मंत्रिमडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर खासदार राऊत हे सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. राऊत म्हणाले की, आजही पंकजा मुंडे यांना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाने फेकून दिले आहे.

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी जर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिलं असेल, तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना सुद्धा त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव नारायण राणे यांनी यापूर्वीही घेतलेला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला मुंबईत नारायण राणे यांच्याकडून काहीही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ मध्ये मुंबईवर भगवा फडकवेल, असा विश्वासही खासदार विनायक राऊत यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

राणेंच्या मंत्रीपदामुळे कोकणात शिवसेनेचे नुकसान होईल, यावर विनायक राऊत म्हणाले की, कोकण आणि शिवसेनेचे नातं अभेद्य आहे. नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरीसुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीत नाही. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात, हेच मोठे दुःख आहे. ते मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो, याचे शल्य फार मोठे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com