काँग्रेसला १२ वर्षांत राणेंची ताकद समजली नाही, ती भाजपने दीड वर्षातच ओळखली - Congress did not understand Rane's strength in 12 years, BJP recognized it in a year and a half | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

काँग्रेसला १२ वर्षांत राणेंची ताकद समजली नाही, ती भाजपने दीड वर्षातच ओळखली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

भारतीय जनता पक्षाला राज्यात एक नंबरवर ठेवण्यासाठी नारायण राणे प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिक प्रयत्न करतील.

मुंबई : जे काँग्रेस पक्षाला बारा वर्षे समजले नाही, ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला दीड वर्षात कळाले. नारायण राणे यांचे नेतृत्व, त्यांचे राजकीय वजन काय आहे, हे भाजपने जाणले. काँग्रेसने वारंवार शब्द देऊनही तो पूर्ण केलेला नाही. मात्र, अवघ्या दीड वर्षात भारतीय जनता पक्षाने मला आमदार केले. माझा मोठा भाऊ नीलेश राणे यांना प्रदेश संघटनेत काम करण्याची संधी दिली आणि नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केले, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी काँग्रेस पक्षावर तोफ डागली. (Congress did not understand Rane's strength in 12 years, BJP recognized it in a year and a half) 

नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार राणे यांना शपथ घेण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी शपथ घेताच राणे यांचे दोन्ही सुपुत्र नीलेश आणि नीतेश राणे यांच्यासह समर्थकांनी आनंद व्यक्त केला. त्यावेळी नीतेश राणे यांनी  काँग्रेसने राणे यांना न्याय दिला नसल्याची खंत व्यक्त केले. आता नारायण राणे यांना कोणते खाते मिळते, याची उत्सुकता समर्थकांसह राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.  

हेही वाचा : भाजपकडून आयारामांना पायघड्या; निष्ठावंतांना नारळ!

नीतेश राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला राज्यात एक नंबरवर ठेवण्यासाठी नारायण राणे प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिक प्रयत्न करतील. राज्याच्या राजकारणाचा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत राणेंचा वरचा नंबर आहे. कोकण आणि राज्यात भाजप वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

नारायण राणे यांचे सहा वर्षांनंतर मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. त्याबाबत नीतेश राणे म्हणाले की, या कमबॅकचे सर्व श्रेय हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मी देईन. जे काँग्रेस पक्षाला बारा वर्षे समजले नाही, ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला दीड वर्षातच कळाले. नारायण राणे यांचे नेतृत्व, त्यांचे राजकीय वजन काय आहे, हे भाजपने दीड वर्षांत ओळखले. कार्यकर्त्यांची जाण असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे मी मानतो. ह्या सर्व पदांचा भारतीय जनता पक्षाला कसा फायदा होईल, हे आम्ही सर्वजण पाहणार आहोत, असेही नीतेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राणे कुटुंबाला राजकीयदृष्टया संपविण्यासाठी विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील. पण राणे कुटुंबीय संपणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी चांगला आणि आनंदाचा आहे, त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी ‘यू टर्न’ देतो, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख