'नाणार'बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे व्यक्तव्य 

आम्ही मते बदलत नसतो.
Chief Minister Uddhav Thackeray's big statement about 'Nanar'
Chief Minister Uddhav Thackeray's big statement about 'Nanar'

मुंबई : कोकणातील नाणार येथील स्थानिक जनतेचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. तो विरोध लक्षात घेऊन आम्ही जनतेच्या बाजूने उतरत प्रकल्पाला विरोध केला. त्याचवेळी आम्ही आमची भूमिका जाहीर केली होती की जे त्या प्रकल्पाचे स्वागत करू इच्छितात, त्यांनी ते करावं. पण, आजही सांगतो की नाणारव्यतिरिक्त आपण जागा ठरवू. तेथील स्थानिकांनी त्याचे स्वागत केले तर आमचा त्याला विरोध नाही. पण, ही रिफायनरी आता नाणारला होणार नाही, हा निर्णय झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यांनी हा प्रकल्प राज्याबाहेर जाणे फायद्याचे नाही, त्यामुळे हा प्रकल्प राज्यातच व्हावा, अशी मागणी केली होती. त्याचबरोबरच शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याचा दावा राज यांनी केला होता. 

त्यासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आम्ही मते बदलत नसतो. कारण, एखाद्या उद्योगाला अथवा रिफायनरील आम्हाला वाटतं म्हणून आम्ही विरोध किंवा पाठिंबा देत नसतो. राज्याच्या हिताचा तो रिफायनरी प्रकल्प आहे. परंतु जिथं तो होणार होता. तेथील स्थानिक जनतेचा त्याला विरोध असल्यामुळे तो निर्णय आम्ही घेतला. ज्यांनी जमिनी खरेदी केल्या, त्यातील काही लोकं आमच्याकडेही आले होते. पण मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासाठी काही निर्णय बदलणार नाही. कारण, आम्ही आमच्या जनतेशी बांधील आहोत. 

रिफायनरी प्रकल्पासाठी राज्यात पर्यायी जागा आहे. एखाद्या कोणताही प्रकल्प चांगला असेल तर तो सोडणे हे राज्याचा हिताचे नाही, हे आम्हाला त्यांच्यासोबत (भाजप) सत्तेत होतो, त्यावेळीही कळत होते आणि आताही आम्हाला कळतं. पण हित म्हणजे काय? नुसता पैसा हा एक भाग झाला. पण पर्यावरण हासुद्धा विषय महत्त्वाचा आहे. नाणारच्या लोकांनी पर्यावरणाला बाधा पोचते; म्हणूनच विरोध केला आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या रिफायनरीला आपल्याकडे योग्य जागा आहे. ते संबंधितांना आणि स्थानिक जनतेला मान्य असेल, तर त्या ठिकाणी प्रकल्प नक्की होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com