फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरेही कोकणाच्या पाहणी दौऱ्यावर

प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत.
Chief Minister Uddhav Thackeray will inspect the damage caused by the cyclone in Ratnagiri, Sindhudurg
Chief Minister Uddhav Thackeray will inspect the damage caused by the cyclone in Ratnagiri, Sindhudurg

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शुक्रवारी (ता. 21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. तसेच, ते प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray will inspect the damage caused by the cyclone in Ratnagiri, Sindhudurg)

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवार (ता. १९ मे) आणि गुरुवारी (ता. २० मे) कोकणात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला वादळाचा बसलेल्या फटक्याची फडणवीस यांनी पाहणी केली. 

मुख्यमंत्री ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. नुकसानीची पाहणी करण्याबरोबच ते प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन होणार आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत ते ८.४० वाजता आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी (ता.मालवणकडे) प्रयाण करणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी १०.१० वाजता वायरी (ता. मालवण) येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर  सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन तेथील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील. सकाळी ११.०५ वाजता निवती (ता. वेंगुर्ला) येथील नुकसानीची पाहणी करतील.
 
या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळाच्या बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन होणार आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक होणार आहे.  

या आढावा बैठकीनंतर चिपी विमानतळ येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि तेथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com