आदित्य ठाकरे सांगतील त्याच फाईलवर मुख्यमंत्री सही करतात

असा मुख्यमंत्री शरद पवार यांना चालतो?
The Chief Minister signs the same file as Aditya Thackeray will say : Narayan Rane
The Chief Minister signs the same file as Aditya Thackeray will say : Narayan Rane

सिंधुदुर्ग : राज्यातील महाविकास आघाडी सरकार फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी चाललंय का. आदित्य ठाकरे सांगतील त्याच फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सही करतात, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर करतात. (The Chief Minister signs the same file as Aditya Thackeray will say : Narayan Rane)

राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून (ता. ५ जुलैपासून) सुरू झाले. अधिवेशन आणि त्यातील घडामोडींवर राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. ‘‘राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षाचं आहे. महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायची असते. मात्र, ते पळून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसाचं अधिवेशन ठेवले आहे. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा,’’ अशा शब्दांत राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

लोकसभेचं अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होऊ शकतं. मात्र, महाराष्ट्रात विधीमंडळाचे अधिवेशन फक्त दोन दिवसाचं का? राज्यात एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनामुळे मात्र त्याची चर्चा केली जात नाही. त्याबाबतचे गांभीर्य सरकारला नाही. मुख्यमंत्रीही त्याबाबत गंभीर नाहीत. आपद्‌ग्रस्थ शेतकऱ्यांचे अजून पैसे दिले नाहीत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, जो कॅबिनेटला जात नाही ना अधिवेशन घेत नाही आणि असा मुख्यमंत्री शरद पवार यांना चालतो?

स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येबद्दल राणे म्हणाले की, स्वप्नीलला नोकरी मिळाली असती, तर तो आज जिवंत असता. त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. स्वप्नील लोणकरच्या मृत्यूनंतर आता आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट सरकार बघतंय असा सवालही नारायण राणेंनी या वेळी केला. 
हे सरकार फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमवत आहे. या सरकारचा एककलमी कार्यक्रम पैसे कमावणे एवढाच आहे. अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येतो आहे. परिवहन मंत्री अनिल परब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अशा मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसींचा इंपेरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही; म्हणून अधिवेशनात ठराव करता. मग, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पन्नास मिनीटे चर्चा कसली करत होता. आपल्या घरातील, पक्षातील कोणावर कारवाई करू नका म्हणून का? असा सवालही त्यांनी या वेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com