राज्याने सुरक्षा काढली, तरी अमित शहांनी माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे : नारायण राणे 

माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास जबाबदार राज्य सरकार असेल.
Amit Shah has taken responsibility for my safety: Narayan Rane
Amit Shah has taken responsibility for my safety: Narayan Rane

रत्नागिरी : "माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने आता काढली, याबाबत माझी काहीही तक्रार नाही; परंतु माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास जबाबदार राज्य सरकार असेल,'' असा इशारा खासदार नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला केंद्राची सुरक्षा पुरवत माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राने घेतल्याचे आवर्जून सांगितले. 

राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेले भाजपचे खासदार राणे यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली. 

ते म्हणाले, "माझी सुरक्षा कालच काढून घेण्यात आली आहे. मी त्याचा जास्त विचार करत नाही. सरकारकडून सातत्याने सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. "झेड प्लस'वरून इथंपर्यंत सुरक्षा आणली. पण, मी काहीच बोललेलो नाही. माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली होती. ती या सरकारने काढून घेतली. मला याबाबत काहीही तक्रार करावयाची नाही. माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. राज्याकडून सुरक्षा कपात करण्यात आली असली तरी केंद्राकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवली आहे. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राने घेतली आहे.'' 

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राणे यांनी व्यक्‍त केले. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. भंडारा येथील घटना भयानक आहे. राज्यात स्त्रियांवरील अत्याचार, दरोडे यामध्ये वाढ झाली आहे. यावर राज्य सरकार नियंत्रण ठेवण्यात अपयशी झाले असल्याचा ठपका राणे यांनी ठेवला. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळाबाबत ते म्हणाले, ""दोन्ही विमानतळे रखडण्याला शिवसेना जबाबदार आहे. येथील कामे पूर्ण करण्यात या सरकारमध्ये दम नाही. सिंधुदुर्ग विमानतळासाठी वीज, पाणी आणि रस्ता या सुविधा पूर्ण करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारला निधी द्यावा लागणार आहे. शिवसेनेमुळे सहा वर्षे विमानतळ होऊ शकले नाही.'' 

शिवसेनेने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली 

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय शिवसेना घेणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुर्ची वजनदार वाटते. कॉंग्रेसने सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी केली. पदासाठी आणि पैशासाठी ते काहीही करू शकतील, असे सांगतानाच शिवसेनेने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप केला. शिवसेना असेपर्यंत रत्नागिरीचा विकास होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com