राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पत्नी कामवाल्या बाईंच्या घरी चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा! - The wife of a NCP minister cooks on a stove in the house of a working woman | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पत्नी कामवाल्या बाईंच्या घरी चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

मंत्री म्हटल्यावर सगळीकडे नोकर-चाकर असतात. त्यामुळे मंत्र्यांच्या पत्नीने स्वतः स्वयंपाक केला आणि तोही चक्क चुलीवर म्हटल्यावर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई :  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सगळा बडेजावपणा अन् आपण मंत्र्याची बायको आहोत हे विसरुन त्यांच्या घरी काम करणार्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. त्यांच्या या साधेपणाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

मंत्री म्हटल्यावर सगळीकडे नोकर-चाकर असतात. त्यामुळे मंत्र्यांच्या पत्नीने स्वतः स्वयंपाक केला आणि तोही चक्क चुलीवर म्हटल्यावर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त होत आहे. या सगळ्या थाटाला आणि बडेजाव पणाला तनपुरे कुटुंब अपवाद आहेत. वागण्या-बोलण्यात असलेला गोडवा आणि सर्वसामान्यांची जुळालेली नाळ तनपुरे कुटुंबाला आणखीनच मोठं करते.

सोनाली तनपुरे यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अचानकपणे हे दृश्य पाहणाऱ्या मंत्री प्राजक्त यांनाही धक्का बसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं त्यांनी म्हटल आहे. 

सोनाली तनपुरे यांनी कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. हे फोटो त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले. त्यामुळे मंत्र्यांची बायको असतानाही चुलीवर आणि तेही कामवाल्या बाईच्या घरी स्वयंपाक करत असल्यामुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख