सत्ताधारी शिवसेनेत पडले दोन गट

मिरकरवाडा येथील मत्स्य उद्योगांसाठी असलेल्या भूखंडांवर 1996 मध्ये शाळेचे आरक्षण टाकण्यात आले.
 Shiv Sena .jpg
Shiv Sena .jpg

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील मत्स्य उद्योगांसाठी असलेल्या भूखंडांवर 1996 मध्ये शाळेचे आरक्षण टाकण्यात आले. तेथील उर्दू शाळा रस्त्यालगत असल्याने अपघाताच्या शक्‍यतेने पर्यायी ठिकाणी शाळा हलविण्यासाठी हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले होते. पालिकेच्या शुक्रवारच्या (ता. १९ मार्च) बैठकीत ते रद्द करून उद्योगासाठी ठेवण्यात आले; मात्र या वेळी सत्ताधारी शिवसेनेत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. या भूखंडाची निविदा प्रक्रिया होणार असल्याने भूखंड मिळविण्यासाठी स्पर्धा होणार आहे. यामुळे अनेकांचे मनसुबे धुळीत मिळाले आहेत.

पालिकेच्या विशेष सभेमध्ये मिरकरवाडा येथील उद्योगासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर 1996 मध्ये शाळेचे आरक्षण टाकण्यात आले होते. उर्दू शाळा रस्त्यालगत होती. नर्मदा सिमेंट फॅक्‍टरीतील कच्च्या मालाची डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. यामुळे तेथे अपघात होण्याच्या शक्‍यतेने पर्यायी ठिकाण म्हणून हे आरक्षण टाकण्यात आले; आता हा मुद्दा शिवसेनेच्या सत्तेत पटलावर आला.

उद्योगासाठी असलेल्या भूखंडांवर शाळेचे आरक्षण टाकता येते का आणि येत नसले तर ते का टाकले? अशा अनेक मुद्यांवर सभागृहात भांडता आले असते; मात्र त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आरक्षण रद्द करण्याबाबत विषय चर्चेला आल्यानंतर ते कायम ठेवावे, म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका उज्वला शेट्ये, सोहेल साखरकर, रशिदा गोदड, बंटी कीर, विकास पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सेनेतच दोन गट पडल्याचे दिसून आले.

पालिकेला परस्पर हे भूखंड देता येतात का? त्याची निविदा प्रक्रिया का केली नाही? असे सवाल भाजप नगरसेवक राजू तोडणकर आणि मुन्ना चवंडे यांनी विचारले. याला उत्तर देताना नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले, सुरेशकुमार खाडिलकर यांनी मागणी केली होती. मात्र, मारुती मंदिर येथील गाळ्यांची निविदा काढून लिलाव केला. त्यातून पालिकेला मोठे उत्पन्न मिळाले. त्या पद्धतीने मिरकरवाड्यातील या भूखंडांची देखील निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून त्याचे मूल्यांकन करून लिलाव प्रक्रिया केली जाईल. जास्त बोली लावणाऱ्याला हे भूखंड दिले जातील. परस्पर दिल्या जाणाऱ्या या भूखंडांसाठी आता बोली लागण्याची शक्‍यता असल्याने अनेकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

शाळेसाठी तो भूखंड योग्य नव्हता, म्हणून यापूर्वीही विरोध केला होता आणि आजही आम्ही सभागृहात ठरावाला विरोध केला. त्यामुळे आरक्षण रद्द करण्याचा झालेला निर्णय योग्य असल्याचे मत भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com