सुप्रिया सुळेंनी खडसेंचे अजितदादांशी फोनवरून बोलणे करून दिले 

पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्‍चित सन्मान होईल, असा विश्वास देतो.
Supriya Sule made Khadse talk to Ajit pawar on the phone
Supriya Sule made Khadse talk to Ajit pawar on the phone

पुणे : एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आज दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या खडसे यांचे अजित पवारांशी खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. अजितदादांनीही नाथाभाऊंचे राष्ट्रवादीत स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

किरकोळ ताप असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, काही माध्यमांनी त्याचा अर्थ खडसे यांच्या पक्षप्रवेशाशी लावत खडसेंच्या इनकमिंगुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. 

खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात खुद्द शरद पवारही त्यावर बोलले होते. "कुठे आहेत अजितदादा नाराज?', असा प्रश्‍न करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी योग्य ती काळजी घेण्याची सूचना दिल्या आहेत. अनेकांना कोरोनाने त्रास दिला, त्यामुळे आपण सगळ्यांबाबतीत काळजी घेत आहोत. त्यासाठी अधिक खबरदारी म्हणून अजित पवार येथे उपस्थित नाहीत. त्यामुळे पक्षात खडसेंच्या प्रवेशावर काही गडबड नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले होते. 

खडसे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांशी खडसे यांचे "व्हॉट्‌स ऍप'वर व्हिडिओ कॉल करून बोलणे करून दिले. त्या वेळी अजितदादांनी खडसे यांचे पक्षात अभिनंदन करत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी ट्विट करत नाथाभाऊ आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले आहे. 

अजित पवारांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, राज्याचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला निश्‍चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. 

"खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्‍चितच उपयोग होईल. नाथाभाऊ, रोहिणीताई खडसे यांच्यासह त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत पक्षात हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्‍चित सन्मान होईल, असा विश्वास देतो,' अशा शब्दांत अजित पवारांनी खडसे यांना पक्षात सन्मानाची वागणूक देण्यात येईल, असा शब्द दिला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com