मानाच्या नऊ पालख्या कशा आणायच्या याचा लवकरच निर्णय : अनिल देशमुख 

वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते रद्द करावेत. कोणतेही पास वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत,
मानाच्या नऊ पालख्या कशा आणायच्या याचा लवकरच निर्णय : अनिल देशमुख 

सोलापूर : कोरोनामुळे यावर्षी पालखी रद्द झाली असली तरी येत्या 30 जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या विमानाने की हेलिकॉप्टरने पंढरीत आणायच्या याबाबत येत्या काही दिवसातत निर्णय होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली आहे. 

दरवर्षी पंढरीच्या पांडूरंगाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, आता कोरोनाचे वैश्‍विक संकट राज्यावर आले असल्याने वारकऱ्यांनी घरी राहून पांडूरंगाची सेवा करावी. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित राहील. मानाच्या पालख्या हवाई मार्गाने की रस्त्यावरुन येतील, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे असेही त्यांनी सांगितले. 

वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते रद्द करावेत. कोणतेही पास वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात अव्वल असल्याने गृहमंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्ता भरणे आदींनी सोलापुरचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली. 

1 जुलै रोजी पालख्या पंढरीतील चंद्रभागा नदीत स्नान करतील असे स्पष्ट करून देशमुख म्हणाले, "" प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील; पालख्यांसोबत एकूण 18-20 वारकरी असतील. 2 जुलै रोजी मंदिरात पालख्यांची भेट होईल आणि तेथून सायंकाळी आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतील. वारीसाठी ज्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.'' 

दरम्यान, कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकार, पोलिस महासंचालक व अन्य पर्यायातून प्रत्येकी 65 लाखांची मदत केली जात आहे. दुसरीकडे संबंधित मृत पोलिस कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार होता,

त्या दिवसापर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासातच राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मृत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदकेही दिली जातील, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. राज्य सरकार व शासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असून त्यांचे कार्य उत्तमप्रकारे सुरु असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com