वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाचा निषेध

वडेट्टीवार यांना ओबीसींचे नेतृत्व करायचे असेल तर, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काम कारावे, असी मागणी कार्यकर्त्यांनी केेली.
Protest of Maratha Kranti Morcha by adding shoes to the image of Vadettiwar .jpg
Protest of Maratha Kranti Morcha by adding shoes to the image of Vadettiwar .jpg

सोलापूर : मराठा आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा राज्यभरातील मराठा समाजाच्या वतीने निषेध केला जात आहे. तर सोलापुरमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा देत, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. 

सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन करीत वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस पक्षाने वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी केली. 

वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता व्हायचे असेल तर खुशाल व्हावं मात्र, मराठा समाजाला आरक्षण दिलेल्या मागासवर्गीय आयोग खोटा आहे, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. वडेट्टीवार यांना ओबीसींचे नेतृत्व करायचे असेल तर, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काम कारावे, असी मागणी कार्यकर्त्यांनी केेली. 

 वडेट्टीवार काय म्हणाले होते? 

ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला केले. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आम्ही कोणाच्या हक्काचे मागत नाही. मराठा आरक्षणासाठी जो गायकवाड आयोग स्थापन झाला त्यावर वडेट्टीवार यांनी टिका केली होती. आमच्या हक्काचे आम्हाला द्या, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. 

या मेळाव्याला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे ओबीसींच्या लढाईला पक्षीय स्वरुप देऊ नका. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींच्यासाठी मोठे काम केले त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींच्यासाठी काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com