धनंजय मुंडेंच्या विरोधात किरीट सोमय्यांचे एक पाऊल पुढे  - One step ahead of Kirit Somaiya against Dhananjay Munde  | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडेंच्या विरोधात किरीट सोमय्यांचे एक पाऊल पुढे 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना दुसऱ्या विवाहाचं प्रकरण चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना दुसऱ्या विवाहाचं प्रकरण चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट मोमय्या यांनी केला आहे. 

किरीट सोमय्या यांनी निवडणुक आयोगाकडे याबाबतची लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निडवणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्तवाचं असणार आहे. सोमय्या यांनी निडवणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच महत्त्वाचे मुद्दे नमूद करत मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. 

धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे. दुसर्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. याशिवाय त्यांची दुसरी पत्नीच्या बहिनिने मुंबई पोलीसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. असं किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटल आहे. 

धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीसाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने  बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. हे सर्व आरोप खोटे असून, बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले आहे. 

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे.

या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख