नारायण राणे-उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील ती बातमी अफवाच 

चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल.
Narayan Rane, Uddhav Thackeray.jpg
Narayan Rane, Uddhav Thackeray.jpg

सिंधुदुर्ग :  येथील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 23 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या चिपी विमानतळाचे उद्धाटन करण्यात येणार होते. मात्र, विमानसेवा सुरू करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्यामुळे उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी दिली.

चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. काही तांत्रिक बाबींची परवानगी अजून मिळाली नसल्याचे सामंत यांनी सांगितेल. तसेच केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. माञ 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही,” अशी माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल. 

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून २३ जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन कार्यक्रम ठरवला जाणार होता.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही उपस्थिती असणार होती.  शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणे व ठाकरे प्रथमच एका व्यासपीठावर येणार असल्याची जोरदार चर्चा कोकणात रंगली होती. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिपी विमानतळाची प्रतिक्षा आहे. तब्बल 20 वर्षांपासून या विमानतळाचे काम रखडले होते. विमानतळ सुरु होण्यासाठी सिंधुदुर्गवासियांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे विमानतळ कोकणासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com