साडेचौदा तास समुद्राशी लढल्यानंतर नौदलचे विमान दिसले अन्‌ आमचा जिवात जीव आला

सहकाऱ्यांनी एकमेकाला धीर देत साडेचौदा तास पाण्यात काढले.
Navy rescues youth from Mangalwedha taluka who was stranded in the sea during cyclone Taukte
Navy rescues youth from Mangalwedha taluka who was stranded in the sea during cyclone Taukte

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मुंबईत नोकरीसाठी गेलेला मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजीत बंडगर (Viswajit Bandagar) हा नवविवाहीत तरुण तौक्ते चक्रीवादळाच्या (cyclone Taukte) तडाख्यात अडकला होता. तब्बल साडेचौदा तासांनंतर त्याची सुटका नौदलाने (Navy) केल्यानंतर दुःखाचा डोंगर पसरलेल्या बंडगर याच्या गावाकडील कुटुंबातील पत्नी, भाऊ, आई वडील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. (Navy rescues youth from Mangalwedha taluka who was stranded in the sea during cyclone Taukte)
          
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजीत बंडगर ह्याची घरची आर्थिक परिस्थितीत बेताचीच होती. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन लवकर निर्माण व्हावे; म्हणून गावातील कामसिद्ध विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने सोलापूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डरचे प्रशिक्षण घेतले. गेल्या वर्षी 29 ऑक्‍टोबरला  लग्न केल्यानंतर तो 25 नोव्हेंबरला कामासाठी मुंबईला गेला. मुंबईमध्ये मेथो असोसिएशन या कंपनीत काम करत असताना तो समुद्रामध्ये बार्जमधून त्याच्या इतर साथीदारांसोबत कमाासाठी गेला होता. 

तत्पूर्वी राज्य सरकारच्या हवामान विभागाने चक्री वादळाबाबतच्या धोक्याचा इशारा दिला होता. तरीही संबंधित कंपनीने त्याकडे  दुर्लक्ष केले. धोक्याचा इशारा मिळताच समुद्रातील इतर बार्ज निघून गेल्या. मागे राहिलेली बार्ज तौक्ते वादळाच्या तडाख्यात सापडली. सुमारे 15 मीटरपेक्षा अधिक मोठ्या लाटांमुळे सर्व कामगारांमध्ये घबराट पसरली. संरक्षक जॅकेट घालून सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या आणि तब्बल साडे चौदा तास पाण्यात जगण्यासाठी संघर्ष करत होते. त्याच्यासोबत असलेले काही सहकारी या वादळाच्या तडाख्यात वाहून गेले. स्वतःला वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, त्यामुळे जोपर्यंत मदतीला कोणी येत नाही, तोपर्यंत आपण वाचू शकणार नाही, अशी खात्री मनात असताना इतर सहकाऱ्यांनी एकमेकाला धीर देत साडेचौदा तास पाण्यात काढले, त्यामुळे खिशात असलेली रोख रक्कम व मोबाईल पाण्यात भिजून बंद पडल्यामुळे त्यांना घरच्यांशी संपर्क साधता येईना. 

इकडे चक्री वादळाच्या बातमीमुळे  गावाकडे कुटुंबातील सर्व सदस्य बैचेन होते. दुसरीकडे आमचा पाण्यात जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच शेवटी हवाई दलाचे विमान ज्या वेळी समोर दिसले, त्यावेळी आमच्या जीवात जीव आला आणि नौदलाने सोडलेल्या दोरीच्या साह्याने आम्ही विमानात चढलो. त्यानंतर आम्ही सर्व सहकारी त्या वादळातून सुखरूप परतलो. 

रविवारी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी विश्वजीतने आई वडिलांशी आणि पत्नी संपर्क साधला होता. त्यानंतर आज सकाळपर्यंत त्याच्या घरातील सदस्यांसोबत संपर्क नव्हता. त्यामुळे घरच्यांनी मुंबईला जाण्याची तयारी केली होती. मात्र, मुंबईवरून सुखरूप असल्याचा विश्वजीतचा फोन आल्यामुळे घरच्यांचा चेहऱ्यावर हास्य उमटले. जगण्यासाठीच्या संघर्षामध्ये त्याच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून समुद्रातील क्षारयुक्त पाणी कानात गेल्यामुळे ऐकू येण्यास त्रास होत आहे. समुद्राशी लढलेला माझा भाऊ वाघ ठरला. घरच्या परिस्थितीत आम्ही संघर्ष केला. आजही संघर्ष करून आलेल्या संकटावर मात केली. नौदल व देवाचे आमच्यावर उपकार झाल्याचे डोळ्यात पाणी आणत विश्वजीतचा भाऊ विनोद बंडगर बोलत होता.  

समुद्रात बुडणाऱ्या टायटॅनिक चित्रपटाप्रमाणेच चित्तथरारक अनुभव आम्ही स्वतः घेतला. संपर्क होत नसल्यामुळे गावाकडील लोक रडत होते. ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते ज्यावेळी मी फोन केला, त्यावेळी त्यांना मी सुखरूप असल्याचे सांगितल्यावर समाधान वाटले. या संकटातून आम्ही वाचलो, ते इंडियन नेव्हीमुळे. तेच आमच्यासाठी देव ठरले आहेत.

-विश्वजीत बंडगर, खुपसंगी (ता. मंगळवेढा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com