उदय सामंतांमुळेच कुलगुरुंचा राजीनामा 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे.
p. P. Patil, .jpg
p. P. Patil, .jpg

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे. प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. वायुनंदन हे ८ मार्चला पदभार स्वीकारणार आहेत.

कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठविला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याचे राजभवनाचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यामुळे ८ मार्च पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार देण्यात येत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाटील यांचा कार्यकाळ २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी संपुष्टात येणार होता. 

कुलगुरू पाटील यांचा अद्याप आठ महिन्याचा कालावधी बाकी होता. विद्यापीठाच्या कारभारात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळेच पाटील यांनी आपला कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच राजीनामा दिला असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील यांनी केला आहे. 

याबाबत त्यांनी म्हटले आहे की, कुलगुरु पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षे त्यांनी चांगला कारभार केला. त्यावेळी त्यांच्या कारभारात कोणाचाही हस्तक्षेप नव्हता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्या नंतर काही संघटना त्यांच्या कामात हस्तक्षेप करीत होत्या. त्यामुळे त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला असल्याचे पाटील म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com