विनायक राऊत मीटर चोर तर, एकनाथ शिंदे... - If Vinayak Raut is a meter thief, Eknath Shinde ... | Politics Marathi News - Sarkarnama

विनायक राऊत मीटर चोर तर, एकनाथ शिंदे...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 जानेवारी 2021

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे केली होती.

मुंबई : जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही, अशा टोला निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे केली होती. त्याला उत्तर देतांना निलेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. 

निलेश राणे यांनी टि्वटरवरुन राऊत यांच्यावर टीका केली. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात....विन्या राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही, म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही.

तर दुसऱ्या टि्वटमध्ये राणे म्हणतात... आम्ही सत्तेत असताना श्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे विषय घेऊन किती वेळा राणे साहेबांना भेटले हे पण एकदा त्यांनी स्पष्ट करावं. स्व.बाळासाहेब हयातीत असताना राणे साहेबांना फोन करायचे. मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्लीतून येते मातोश्रीतून नाही हेदेखील या अडाणी खासदाराला माहित नाही. 

विनाय राऊत काय म्हणाले होते?

''नारायण राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्ही सुद्धा कधी एकेरी बोलत नाही. पण निलेश राणेंची भाषा असभ्य असते. खर तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे लागते ते सर्व उपलब्ध होते. पण दोघांना त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. राणेंनाही खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे,'' असे राऊत म्हणाले होते.

शिवसेना मध्यवर्ती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी राणे कुटुंबावर तुफान टीका केली होती. राणे यांच्या मेडिकल काॅलेजचा मुद्दा उपस्थित करत राऊत म्हणाले होते, "मी आता उघड करू का कणकवलीकराणांचा समोर? पत्रकारांच्या समोर सांगतोय जा त्या नारायण राणे यांना विचारा की दोन महिन्यांपूर्वी तुम्ही मातोश्रीवर फोन किती वेळा केले होते? कशाला फोन करता होता मोतोश्रीवर? उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलायचं आहे असे म्हणत दिवसाला तीन तीन फोन केले. खोटं असेल तर आई बाबांची शपथ घेऊन सांगा. मी सांगतो हे खरं आहे,"

''देवेंन्द्र फडणवीस यांनी राणेंना अखेर पर्यत कॉलेज दिल नाही. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. देवेन्द्र फडणवीस यांच्या आश्रयाला जाऊन सुद्धा कॉलेज राणेंना कॉलेज मिळाळे नाही," असाही राऊत यांचा दावा होता.

एक वर्षांपूर्वीच नारायण राणे यांचे कटर राणे समर्थक असलेले सतीश सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांचा तीळपापड होत आहे, असे सांगून राऊत म्हणाले होते......''तोच राग ठेवत सतीश सावंत यांची संचयनी घोटाळा प्रकरणी तक्रार करण्यासाठी राणे अनुराग ठाकूर यांच्याकडे दिल्लीला जाणार आहेत. आम्हाला माहिती नाही का की नितेश राणे यांनी नवी मुंबईच्या म्हात्रे नावाच्या इसमाला १२ कोटींचा गंडा नवी मुंबईमध्ये घातला तो? आम्हाला माहिती नाही का की निलेश राणे यांनी चिपळूणच्या संदीप सावंत यांना गाडीमध्ये घालून कसे मारत- मारत नेलं? अशोक राणेंचा खून कोणी केला हे आम्हाला माहिती आहे. मनचेकर यांच डोकं कोणी फोडलं आम्हाला माहिती नाही का? सगळी कुंडली आहे जा खुशाल दिल्लीमध्ये. या १२ कोटींच्या केसमध्ये त्यावेळी नितेश राणे याला देवेन्द्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते. त्याचे वडील शरण गेले भाजपला. म्हणून ती केस थांबली,''

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख