धनंजय मुंडेंनी दिली संजय राठोडांना क्लिनचिट  - Dhananjay Munde gave a clean chit to Sanjay Rathore  | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडेंनी दिली संजय राठोडांना क्लिनचिट 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पूजाच्या मृत्यूनंतर अनेक अॉडिओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल झाला आहेत. त्यामुळे भाजपकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

बीड : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संशयाची सुई मंत्री संजय राठोड यांच्याकडे जात आहे. पूजाच्या मृत्यूनंतर अनेक अॉडिओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल झाला आहेत. त्यामुळे भाजपकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंडे म्हणाले की, पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्याच आहे. तसेच या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण, या आत्महत्याप्रकरणाची चौकशी देखील सुरु आहे. त्यामुळे चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल. असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.  

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा 

दरम्याण,  ''पूजावर आर्थिक ताण होता. तसेच ती सतत आजारी असायची. याच कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी. माझा कोणावरही संशय नाही,'' असे पूजा चव्हाणचे वडिल लहू चव्हाण त्यांनी स्पष्ट केले आहे. पूजाच्या मृत्यूनंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. पण या प्रकरणावर अद्याप तिचे वडील काहीही बोलले नव्हते. अखेर त्यांनी माध्यमांशी बोलताना आमची नाहक बदनामी थांबवा, असे आवाहन केले होते.

पूजाच्या मृत्यूसाठी माझा कोणावरही संशय नसल्याचे सांगत ते म्हणाले, पोल्ट्री व्यवसायासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. पण हा व्यवसाय दोन वर्षांपासून तोट्यात आहे. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली. आता बर्ड फ्लूमुळे त्यात आणखी भर पडली आहे. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, यावरून पूजा तणावाखाली होती. मी तिला ताण घेऊ नकोस, असे सतत सांगायचो. ती सतत आजारीही असायची. याचा ताणही तिच्या मनावर होता. बहुतेक याच कारणांमुळे तिने आत्महत्या केली असावी, असे वाटत असल्याचे ते म्हणाले.  

एक एमबीबीएस डॅाक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...
 

पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती धाडसी होती. तिच्यावर असलेल्या ताणामुळेच तिने आत्महत्या केली असावी. त्यामागे अन्य कोणतेही कारण नाही. त्यामुळे समाजमाध्यमांनी आमची बदनामी थांबवायला हवी. पोलिसांनाही मी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. चौकशीमधून काय ते पुढे येईलच, असेही लहू चव्हाण यांनी सांगितले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पूजा चव्हाण माझ्या मतदार संघातील आहे. तीच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख