माजी आमदार युनूसभाई शेख यांना उपमुख्यमंत्री पवार यांची श्रद्धांजली 

माजी आमदार युनूसभाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, महापौर अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली. या कार्यकाळात त्यांनी सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
Deputy Chief Minister Pawar Tribute to former MLA Yunusbhai Shaikh
Deputy Chief Minister Pawar Tribute to former MLA Yunusbhai Shaikh

मुंबई : माजी आमदार युनूसभाई शेख यांचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. सोलापूरकर त्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युनूसभाईंना श्रद्धांजली अर्पण केली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, माजी आमदार युनूसभाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, महापौर अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली. या कार्यकाळात त्यांनी सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 

त्यांच्या कामाची आणि निष्ठेची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युनूसभाई यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. सामान्य सोलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम आग्रही राहिले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या विविध प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. 

दरम्यान माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात चार मुलगे, तीन मुली असा परिवार आहे 

ते 1969, 1975 आणि 1985 अशा तीन वेळा सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. शरद पवार 1975 मध्ये सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूसभाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले होते. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. त्यांची 1990 मध्ये विधान परिषदेवर निवड झाली होती. मात्र 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com