Gulabrao Patil .jpg
Gulabrao Patil .jpg

गुलाबराव पाटलांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली तात्काळ मान्य 

यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.

जळगाव : जिल्ह्यात रेमेडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ होकार दिला.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज ऑनलाईन पार पडली. पाटील हे जळगाव येथून सहभागी झाले होते. आजच्या बैठकीत लॉकडाऊन वा याला सक्षम पर्याय बाबत सविस्तर चर्चा झाली. यात गुलाबराव पाटील यांनी अन्य दोन मंत्र्यासह वीकेंड लॉकडाऊनचा पर्याय सुचवला. याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. 

राज्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात शेतमालाच्या वाहतुकीला बंदी घालू नये आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर मात्र, निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली. पाटील यांची ही मागणी देखील मान्य करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमेडेसिवीर खासगी पातळीवर कृत्रीम टंचाई सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर शासकीय रूग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा अशी, मागणी देखील पाटील यांनी केली. यावर जळगाव जिल्ह्यात रेमेडेसिवीर इंजेक्शनची टंचाई भासणार नाही इतका पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी उद्या (सोमवार, 5 एप्रिल) रात्री 8 पासून ते 30 एप्रिलपर्यंन्त कठोर निर्णय लागू राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी  ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: 
 
शेतीविषयक कामे सुरु

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील. 
 
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल.  सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.  
 
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com