भाजपचा फायनल आकडा ठरला, पाच हजार ७८१ गावांवर सत्ता  - BJP became the final figure, ruling over 5,781 villages | Politics Marathi News - Sarkarnama

 भाजपचा फायनल आकडा ठरला, पाच हजार ७८१ गावांवर सत्ता 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे, असं सांगतानाच आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो.

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचे भाजपेने म्हटले आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यानुसार आकडेवारी जाहीर केली आहे. आम्ही राज्यातील एकूण 14 हजार 202 ग्रामपंचायती पैकी 5 हजार 781 ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा भाजपने केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात 5 हजार 781 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे भाजपेने म्हटले आहे. तर महाविकास आघाडीने देखील राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. 

ग्रामपंचायत निकाला नंतर प्रत्येक पक्षाने आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काहीही दावा करू द्यात. माझ्या हातात आता आकडेवारी आहे. त्यानुसार आम्ही राज्यात सहा हजारपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले आहेत.

आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे, असं सांगतानाच आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो. उगाचच काहीही दावे करत नाही, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले होते. 

ते म्हणाले होते की, राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. असा दावा उपाध्ये यांनी केला होता. 

ग्रामपंचायत निवडणुकीतून नागरिकांचा सरकारच्या विरोधातील रोष दिसून आला आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही भाजपच नंबर एकचा पक्ष झाला. मी कोरोना परिस्थिती, ओला दुष्काळ या काळात गावोगावी फिरल्याचे प्रतिबिंब निकालांमध्ये पाहायला मिळतेय, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.  

निकालानंतर प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी भाजपने जाहीर केली आहे.  सिंधुदुर्गमध्ये 70 पैकी 45 तर रत्नागिरीमध्ये 479 पैकी 59 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. पुणे जिल्ह्यातीतल 748 पैकी 200 व कोल्हापूरमधील 433 पैकी 189 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते निवडून आले असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी जाहीर करत भाजप नंबरवन असल्याचा दावा केला आहे. 

भाजपने जिल्ह्यानुसार जाहीर केलेली आकडेवारी  
 

सिंधुदुर्ग 70 पैकी 45 
रत्नागिरी 479 पैकी 59 
रायगड 88 पैकी 33 

ठाणे ग्रामीण 151 पैकी 105
पालघर 3 पैकी एकही नाही
नंदुरबार 87 पैकी 27 

धुळे 218 पैकी 117 
नाशिक 621 पैकी 168 
जळगाव 783 पैकी 372

अहमदनगर 767 पैकी 380
 बुलढाणा 527 पैकी 249 
अकोला 222 पैकी 123

 वाशिम 163 पैकी 83 
अमरावती 553 पैकी191 
यवतमाळ 980 पैकी 419 

वर्धा 50 पैकी 28 
नागपूर 130 पैकी 73 
भंडारा 148 पैकी 91 

गोंदिया 189 पैकी 106 
गडचिरोली 368 पैकी अद्याप आकडेवारी नाही 

चंद्रपूर 629 पैकी 344 
नांदेड 1015 पैकी 442 
परभणी 566 पैकी 229

हिंगोली 495 पैकी 191 
जालना 475 पैकी 253 
औरंगाबाद 618 पैकी 208 

बीड 129 पैकी 67 
लातूर 383 पैकी 211 
उस्मानाबाद 428 पैकी 180 

पुणे 748 पैकी 200 
सोलापूर 658 पैकी 204 
सातारा 879 पैकी 337 

कोल्हापूर 433 पैकी 189 
सांगली 152 पैकी 57  

एकूण 14,202 पैकी 5781

 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख