अनिल देशमुखांनी उडवली विखे पाटलांची खिल्ली - Anil Deshmukh criticism of Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुखांनी उडवली विखे पाटलांची खिल्ली

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

मोफत बीज देण्याची मागणी केली नव्हीती तरी मंत्री घोषणा करुन मोकळे झाले होते, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सकारवर केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

पुणे  : मोफत बीज देण्याची मागणी केली नव्हीती तरी मंत्री घोषणा करुन मोकळे झाले होते, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सकारवर केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

देखमुखांनी ट्विट करत म्हटलंय की, ''विखे पाटील जी, सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच,'' असा टोला अनिल देशमुखांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. 
 
शुक्रवारी भाजपकडून वीजबिलाच्या वाढीबाबत राज्यभरात आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या कार्यालयांना टाळेठोको आंदोलन कार्यकर्त्यांनी केले. विखे पाटलांच्या नेतृत्वात वीज कंपन्यांविरोधात राहता येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी राज्य सरकारव टीका करताना विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत कधीच बिघाडी झाली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने वीजबिलाचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर संतप्त जनता प्रकाशगडावर धडकेल असा इशा विखे यांनी दिला होता, त्यावरुन देशमुख यांनी विखे पाटलावर टिका केली. 

शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धित ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करणार होते. तत्पूर्वी राज्यातील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या संवादानंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतले, यावेळी माध्यमांशी संवाद साधण्यात आल. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिल्याचं पत्रकार परिषदेत दिसून आलं, मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना बसण्यासही खुर्ची नसल्याचं पाहून गृहमंत्री अनिल देखमुखांनी टीका केली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख