एकही अॅम्ब्युलन्स मिळणार नाही...तुमचा रुग्ण तडफडून मरेल! अॅम्ब्युलन्स मालकाची दादागिरी

अॅाक्सीजन नसल्याने रुग्णवाहिका परत पाठवल्याने चिडलेल्या मालकाने नातेवाईकांना शिवीगाळ करत थेट धमकी दिली.
Ambulance owner threatened relatives in Sindhudurg
Ambulance owner threatened relatives in Sindhudurg

सिंधुदुर्ग : कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णावाहिका चालक-मालकांकडून भरमसाठ पैसे घेतले जातात. पैशांसाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो. नातेवाईकांची अडवणूक करून त्यांना अक्षरश: लुटले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार देवगडमध्ये समोर आला आहे. (Ambulance owner threatened relatives in Sindhudurg) 

अॅाक्सीजन नसल्याने रुग्णवाहिका परत पाठवल्याने चिडलेल्या मालकाने नातेवाईकांना शिवीगाळ करत थेट धमकी दिली. सिंधुदुर्गामधील एकही अॕम्ब्युलन्स देवगड येथून मुंबईला येणार नाही, तशी व्यवस्था केलीय. तुमचा पेशंट तडफडून मरेल, अशा भाषेत त्याने नातेवाईकांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रणाली बांदिवडेकर यांनी जिल्हाधिकारी व पो.लिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.

प्रणाली बांदिवडेकर यांचा पुतण्या अमोल हा देवगड तालुक्यातील मीठबाव गावी त्याच्या मामाकडे दोन महिन्यांपासून राहत आहे. सोमवारी (ता. १७) त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे देवगड तहसिल कार्यालयाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती काहीशी खालावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळं डॅाक्टरांनी त्याला मुंबईला हलवण्यास सांगितलं. त्यासाठी परिसरातील रुग्णावाहिका मालक विशाल जाधव यांना विनंती केली. त्यांनी ३० हजार रुपये भाडे सांगितले. पण नंतर बराच वेळ त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

थेट रात्री आठ वाजता रुग्णवाहिका रुग्णालयात आली. पण रुग्णावाहिकेत केवळ एक अॅाक्सीजन सिलिंडर होता. त्यामध्ये किती अॅाक्सीजन आहे, याची चालकाला कल्पना नव्हती. त्यामुळं रुग्णवाहिका परत पाठवण्यात आली. त्यानंतर मालकाने फोन करून अरेरावी करत भाड्याची मागणी केली. तसेच तुम्हाला एकही रुग्णवाहिका मिळणार नाही, तशी व्यवस्था केली आहे. तुमचा रुग्ण तडफडून मरेल, असा धमकीवजा इशारा दिल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले.

 या प्रकारानंतर बांदिवडेकर कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. मनसे नेते परशुराम उपरकर यांनीही सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक व परिवहन अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. विशाल जाधव यांच्या.वर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उपरकर यांनी दिला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com