सचिन वाझेंच्या अटकेनंतर गृहमंत्री देशमुख म्हणाले...

सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते.
Anil Deshmukh .jpg
Anil Deshmukh .jpg

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज अटक केली. तत्पूर्वी सुमारे 12 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. त्या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच चौकशीनंतर संबंधितांवर करावाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयए व एटीएसकडून सुरू आहे. त्यामुळे, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, त्यानुसार आरोपींवर कारवाई होईल, असे देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते. त्यात त्यांनी जग सोडण्याची भाषा केली होती. 3 मार्च 2004 ला सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्षे होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्षे आहेत ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे वाझे यांनी व्हॉट्‌सऍप स्टेटसमध्ये म्हटले होते. 

नाना पटोले काय म्हणले? 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जी कथीत स्फोटकांची गाडी मिळाली त्यात स्फोटके नव्हती. जी गाडी सापडली ती अंबानींच्या घराजवळ देखील नव्हती. विरोधी पक्षाने केवळ अंबानी यांचा वापर करुन विधानपरिषदेच्या  कामकाजाचा दुरुपयोग केला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केला. 

ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत आहेत.  विरोधी पक्ष  सध्या खोट्या बोंबा करून डबल ढोलकी वाजविण्याचे काम करीत आहे,

पटोले म्हणाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाजे यांचा केंद्राच्या यंत्रणेकडून तपास सुरू आहे. यामध्ये विरोधी पक्ष खोट्या बोंबा मारून वातावरण तापविण्याचे काम करीत आहेत. त्यांना कोणत्याही मार्गाने खोटा प्रचार उभा करुन जनतेत भ्रम मिर्माण करायचा आहे. त्यातूनच सचिन वाझेना खलनायक बनवण्याचे काम विरोधक करत आहेत. या प्रकरणात तपास यंत्रणानी नार्को टेस्ट करायची असेल तर ती देखील करावी.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील 171 आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. निवडणूकीला आम्ही घाबरत नाही.  विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्षांची निवड होईल.कोणालाच घाबरण्याचे कारण नाही.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com