दावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले! - Nilesh Rane Tweets about Uddhav Thackeray and Dawood Ibrahim Threat | Politics Marathi News - Sarkarnama

दावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कॉल दुबईतून आल्याचे समोर आले असून, हे कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाने केल्याचे समजते. याच बातमीवरुन निलेश व नितेश राणे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून ट्वीट केली आहेत

मुंबई : आता नवीन नाटक. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार अंगावर आले, आम्ही उडवून दिले. पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे,'' असे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले आहे.

दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन...मंत्र्यांचे फोन उचलत नाहीअन दाऊदचा लगेच उचलला?, असे म्हणत निलेश यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनीही ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांला छेडले आहे. ''शेवटी..महाराष्ट्र च्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला.. डायरेक्ट दाऊद ची धमकी आली..आता तरी घरातून बाहेर निघा..मुख्यमंत्री साहेब!!'' असे ट्वीट नितेश यांनी केले आहे. 

संबंधित लेख