मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या त्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल 

त्या घटनेनंतर कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
A case has been registered against the BJP leader who spoke offensively about the Chief Minister
A case has been registered against the BJP leader who spoke offensively about the Chief Minister

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे यांनी फिर्याद दिली. 

दरम्यान, शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी त्यांना चोपही दिला होता. त्या घटनेनंतर कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भारतीय जनता पक्षाने आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) कोरोना काळातील वाढीव वीजबील माफीच्या मागणीसाठी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कटेकर यांनी भाषण केले होते. त्यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हीडीओ क्‍लिप शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद पंढरपूर शहर व तालुक्‍यात उमटले होते. त्यातूनच शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) सायंकाळी शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी चांगलाच चोपही दिला होता. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जयवंत माने, सुधीर अभंगराव, संदीप केंदळे, सिध्देश्वर कोरे यांनी पंढरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेवून वादग्रस्त वक्तव्य करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिरीष कटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन दिले.

त्यानुसार रात्री संशयित आरोपी शिरीष कटेकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पंढरपूरचे पोलिस निरीक्षक अरुण पवार पुढील तपास करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com