लाॅकडाऊनचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक

'क्रिसिल' या भारतीय विश्‍लेषक कंपनीच्या मतानुसार, स्वातंत्र्यानंतर आलेली ही भारतातील चौथी आर्थिक मंदी आहे. आर्थिक उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी असून कदाचित ही आतापर्यंतची सर्वात वाईट मंदी ठरू शकते.
Mental Stress is more in Men during Lock Down
Mental Stress is more in Men during Lock Down

मुंबई  : टाटा कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणातून लॉकडाऊनमुळे काही जणांमध्ये संतापाच्या भावनेचा उद्रेक होत असल्याचे समोर येत आहे. देशात आलेली कोरोनाची साथ व त्यामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेली बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे, यामुळे अनेकांना शारीरिक व मानसिक आरोग्याचे प्रश्‍न भेडसावत आहेत. यामध्ये पुरेशी झोप न लागणे, पाठदुखी, थकवा, तणाव, चिंता अशा अनेक समस्यांचाही समावेश आहे. 

संतापाच्या भावनेला महिलांपेक्षा पुरुष अधिक बळी पडत असल्याचे या 'टाटा सॉल्ट लाइट' सर्वेक्षणात दिसून येत आहे. कामासंबंधीच्या तणावामुळे २० टक्के स्त्रियांमध्ये मोठा तणाव असतो; तर सक्तीने काम करण्यास भाग पाडल्यास आपल्या संतापाचा स्फोट होतो, अशी कबुली ६४ टक्के पुरुषांनी दिली आहे; तर अशी कबुली देणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ५८ टक्के आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणाई तंत्रज्ञानातील किरकोळ व्यत्ययांमुळेही आपला संयम गमावते. त्या तुलनेत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती संतुलन राखून असतात, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहेत.  तरुणाईतील ६ जणांपैकी एकाने तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या हे  तणावाचे प्रमुख कारण असल्याचे सर्वेक्षणात सांगितले आहे. ४५ वर्षांपुढील व्यक्तींमध्ये हे प्रमाण केवळ १२  टक्के आहे.

हे करा उपाय
शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार उच्च रक्तदाब हा आहे. तो टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आपण घरातून काम करत असू, तर अधूनमधून खुर्चीतून उठणे किंवा दर एका तासाने फिरून येणे गरजेचे आहे. रेस्टॉरंट्‌समधून जेवण मागवण्यापेक्षा घरीच पारंपरिक पदार्थ बनवावेत. जलद चालणे, योगासने, यांसारखे व्यायाम उपयुक्त ठरतात. रात्री किमान ६ ते ८ तास झोप घेणेही आवश्‍यक आहे, असे उपाय टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या न्यूट्रिशन तज्ज्ञ कविता देवगण यांनी सुचवले आहे.

ग्राहकांच्या खरेदीचे स्वरूपही बदलले
कोविड-१९च्या  उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ग्राहकांच्या खरेदीचे स्वरूपही बदलले आहे. 'ऍक्‍सेन्चर' संस्थेच्या संशोधन अहवालानुसार, खरेदी करण्याची सवय कायमची बदलण्याची गरज ग्राहकांना आता वाटू लागली आहे. मर्यादित खाद्यपदार्थ आणि आरोग्यपूर्ण वस्तूंची जाणीवपूर्वक खरेदी करणे, या दोन उच्च रक्तदाब हा  प्राधान्याच्या बनल्या झाल्या आहेत. सोयीस्कर, साठवणुकीस सोप्या आणि आरोग्य व पोषणासाठी योग्य अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे, असे एफएमसीजी कंपन्यांचे निरीक्षण आहे.

भारतीय पदार्थांना वाढली मागणी
कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर घरगुती शिजवलेल्या अन्न पदार्थांना विशेषतः निरोगी आणि पौष्टिक अशा पारंपरिक भारतीय पदार्थांना मागणी वाढली आहे. त्या अनुषंगाने ग्राहकांच्या खाण्याच्या सवयीही बदलल्याचे टाटाच्या पाकीटबंद खाद्यपदार्थ विभागाच्या अध्यक्षा रिचा अरोरा यांनी सांगितले.

सर्वात वाईट मंदी
'क्रिसिल' या भारतीय विश्‍लेषक कंपनीच्या मतानुसार, स्वातंत्र्यानंतर आलेली ही भारतातील चौथी आर्थिक मंदी आहे. आर्थिक उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी असून कदाचित ही आतापर्यंतची सर्वात वाईट मंदी ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com