मुंबई मा जलेबी अणे फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

मुंबईत गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. मुंबईतले अनेक व्यवसाय या समाजाच्या ताब्यात आहेत. ही व्होट बँक काबीज करण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. मुंबईच्या गुजराती समाजात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे. हा प्रभाव कमी करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत
Uddhav Thackeray Trying to woo Gujrati Voters
Uddhav Thackeray Trying to woo Gujrati Voters

मुंबई : राज्यात आगामी काळात दहा महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या व विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा चंग एकेकाळी मराठी माणसासाठी लढा देणाऱ्या शिवसेनेने बांधला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या १० तारखेला जोगेश्वरीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

विशेषतः मुंबईत गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. मुंबईतले अनेक व्यवसाय या समाजाच्या ताब्यात आहेत. ही व्होट बँक काबीज करण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. मुंबईच्या गुजराती समाजात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे. हा प्रभाव कमी करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. यासाठी शिवसेनेने गुजराती भाषेत पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

मुंबई मा जलेबी अणे फाफडा, उद्धव ठाकरे आपडा... या मथळ्याखाली हा मेळावा होणार असून जोगेश्वरीत होणाऱ्या या मेळाव्यात १०० गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना संघटक हेमराज शहा यांच्यावर या मेळाव्याची व गुजराती समाजाला शिवसेनेकडे वळविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेच्या बदलत्या भूमीकेबद्दल सतत टीका करत आहे. मध्यंतर एका उर्दू भाषेतील कॅलेंडरवरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरुन भाजप सतत शिवसेनेला टार्गेट करते आहे. गेल्या वर्षी एका शिवसेना नेत्याने अजान स्पर्धेचे आयोजन करण्याचे जाहीर केले होते. त्यावरूनही भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. आता आपल्याच पारंपारिक मतदारांना शिवसेना हात लावते आहे हे पाहून भाजप कुठले पाऊल उचलणार याबाबत उत्सुकता आहे.
Edited By - Amit Golwlakar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com