ड्रग्जची देवाणघेवाण कुरिअरमार्फत : रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना रिया चक्रवर्तीचे ड्रग कनेक्शन समोर आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती भायखळा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या चौकशीत आणखी काही नावे समोर आली आहेत. याच चौकशीत तिने आपल्या घरी कुरियर मार्फत गांजा आल्याची माहिती एनसीबीला दिली आहे
Rhea Sent Drugs Through Courier
Rhea Sent Drugs Through Courier

मुंबई :अभिनेत्री रिया चक्रवर्ती कडे एनसीबीने केलेल्या चौकशीत ड्रग्सप्रकरणी नवेनवे खुलासे होत आहेत.लाॅकडाऊनच्या काळात रियाला सुशांत च्या घरून स्वत:च्या घरी अर्धा किलो गांजा पाठवण्यात आला होता. गांजा पाठवताना पकडू जाऊ नये म्हणून कुरीयर कंपनीद्वारे हे पाकीट पाठवण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना रिया चक्रवर्तीचे ड्रग कनेक्शन समोर आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती भायखळा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या चौकशीत आणखी काही नावे समोर आली आहेत. याच चौकशीत तिने आपल्या घरी कुरियर मार्फत गांजा आल्याची माहिती एनसीबीला दिली आहे. थोडाथोडका नव्हे तर तब्बल अर्धा किलो गांजा पाठविण्यात आल्याचे तिने उघड केले आहे. आपल्या घरी कुरिअर मार्फथ गांजा आला होता. हे 'पार्सल'आपला भाऊ शौविकने स्वीकारले, अशीही माहिती तिने दिली आहे. संबंधित कुरिअर बाॅयने शौविक व रिया या दोघांनाही ओळखले आहे. आता एनसीबी कुरिअर बाॅयचे काॅल डिटेल्स चेक करत आहे.

दरम्यान, आपल्या चौकशीत रियाने सारा अली खान, राकुल प्रितसिंग, सिमोन खंबाटा, सुशांतची मैत्रिण व पूर्वीची मॅनेजर रोहिणी अय्यर व चित्रपट निर्माते मुकेश छाब्रा यांची नावे घेतली आहे.  अभिनेत्री कंगना राणावतनेही बाॅलीवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध उघड करताना अनेक ट्वीट केली होती. त्यात तिने अनेक आघाडीच्या अभिनेत्यांची नांवेही घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाच्या चौकशीत आणखी पंधरा बाॅलीवूड अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. या सगळ्यांकडेही चौकशी होण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अंमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयासमोर सांगितले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाची चौकशी पूर्ण झाली आहे. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती.

दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. रियावर तिच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com