पंतप्रधानांनी कोहलीला विचारले.....यो-यो टेस्ट म्हणजे काय? - Prime Minister Narendra Modi Asked Virat Kohli about Yo Yo Test | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानांनी कोहलीला विचारले.....यो-यो टेस्ट म्हणजे काय?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

यो चाचणीच्या वीस मीटर अंतरावर दोन प्लॅस्टीकचे कोन ठेवलेले असतात. खेळाडू एका कोनपासून सुरुवात करतो. बीप वाजल्यावर ही सुरुवात होते. पुन्हा बीप वाजण्याच्या आत खेळाडूला कोनपर्यंत पोहोचणे आवश्‍यक असते तर तिसरा बीप होण्यापूर्वी पुन्हा आपल्या जागेवर परतावे लागते. प्रत्येक फेरीनंतर दोन बीपमधील अंतर कमी होते. अर्थातच खेळाडूस धावण्याचा वेग प्रत्येक फेरीगणिक वाढवणे भाग पडते.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंची यो यो टेस्ट घेतली जाते. ही चाचणी काय असते, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यास केली. त्याचबरोबर ही चाचणी कोहलीसही सक्तीची असते का याबाबतही पंतप्रधानांना औत्युक्‍य होते.

फिट इंडिया मूव्हमेंटच्या एका वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहली तसेच अनेक फिटनेस तज्ज्ञांसह चर्चा केली. त्यावेळी मोदींनी यो - यो टेस्ट नेमकी काय असते आणि कर्णधार असल्याने कोहलीला सूट दिली जाते का अशीही विचारणा केली. "भारतीय खेळाडूंचा फिटनेस जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. जागतिक क्रीडापटूंच्या तुलनेत आपली तंदुरुस्ती खूपच कमी आहे. त्याकडे सध्या आम्ही लक्ष दिले आहे. कोणत्याही खेळासाठी तंदुरुस्ती अत्यावश्‍यक असते," असे कोहलीने सांगितले.

भारतीय क्रिकेट संघातील स्थान निश्‍चित करण्यासाठी प्रत्येकास ही चाचणी द्यावीे लागते. त्यास कोणीही अपवाद नसते. ही चाचणी मी सर्वप्रथम देतो. या चाचणीत उत्तीर्ण न झाल्यास निवडीसाठी माझाही विचार होत नाही. तंदुरुस्तीची संस्कृती निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे तंदुरुस्तीचा स्तर ऊंचावण्यास मदत होईल, असेही भारतीय कर्णधाराने सांगितले.

यो-यो चाचणी म्हणजे...
यो यो चाचणीच्या वीस मीटर अंतरावर दोन प्लॅस्टीकचे कोन ठेवलेले असतात. खेळाडू एका कोनपासून सुरुवात करतो. बीप वाजल्यावर ही सुरुवात होते. पुन्हा बीप वाजण्याच्या आत खेळाडूला कोनपर्यंत पोहोचणे आवश्‍यक असते तर तिसरा बीप होण्यापूर्वी पुन्हा आपल्या जागेवर परतावे लागते. प्रत्येक फेरीनंतर दोन बीपमधील अंतर कमी होते. अर्थातच खेळाडूस धावण्याचा वेग प्रत्येक फेरीगणिक वाढवणे भाग पडते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख