गोरगरीब जनतेची भूक भागवणारी 'शिवभोजन थाळी' झाली एक वर्षाची

ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख 'अन्नपूर्णेची थाळी' म्हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी पाच लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे
Shivbhojan Thali Becomes One year old
Shivbhojan Thali Becomes One year old

मुंबई  : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख 'अन्नपूर्णेची थाळी' म्हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी पाच लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

हे सरकार संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसूत्रीत 'भुकेलेल्यांना अन्न' हे एक सूत्र आहे ते डोळ्यासमोर ठेवून शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोच नाही, तर कोट्यवधी लोकांची भूक भागवण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्र चालक यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात ९०५ शिवभोजन केंद्रे
राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. एक वर्षभरात शिवभोजन योजनेंतर्गत ९०५ केंद्रे सुरू झाली असून योजनेवर आतापर्यंत ८६.१० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

थाळी झाली आणखी स्वस्त...
सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते, परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर २९ मार्च २०२० पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात ४५; तर ग्रामीण भागात ३० रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी 'शिवभोजन' ऍप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुका स्तरापर्यंत विस्तार झाला आहे.

टाळेबंदीच्या काळात मजूर, स्थलांतरित लोक, राज्यातच पण बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने फक्त पाच रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूक भागवण्याचे काम केले. चपाती, भाजी, वरण-भाताचं जेवण असणारी ही थाळी आज अनेक गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे.

वितरित थाळींची महिनानिहाय संख्या
जानेवारी- ७९९१८
फेब्रुवारी- ४,६७,८६९
मार्च- ५,७८,०३१
एप्रिल- २४,९९,२५७
मे- ३३,८४,०४०
जून- ३०,९६,२३२
जुलै- ३०,०३,४७४
ऑगस्ट- ३०,६०,३१९
सप्टेंबर- 30,59,176
ऑक्‍टोबर- ३१,३४,०६३
नोव्हेंबर- २८,96,130
डिसेंबर- 28,६५,९४३
जानेवारी २०२१ (२५ जानेवारी पर्यंत) २४,०४,१९२
एकूण ३,०५,३९,६४४
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com