सुशांतसिंगवरील बायोपिक रखडणार; कुटुंबीयांचा आक्षेप - No movie on Sushantsinh Rajput in Near future | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंगवरील बायोपिक रखडणार; कुटुंबीयांचा आक्षेप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांच्या वकिलांनी आधीच सांगितले आहे, की सुशांतच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय सुशांतच्या जीवनावर कोणताही चित्रपट, मालिका किंवा पुस्तक बनवता येणार नाही. जोपर्यंत सुशांतच्या कुटुंबीयांना कोणतीही स्क्रिप्ट दाखवली जात नाही आणि सुशांतचे वडील आणि त्याच्या बहिणी त्याला संमती देत नाहीत तोपर्यंत सुशांतसिंगच्या जीवनावर काही लिहिता किंवा बनवता येणार नाही

मुंबई : सुशांतसिंग राजपूत यांचे निधन होऊन तब्बल ४ महिने झाले आहेत. यादरम्यान सुशांतच्या जीवनावर आधारित दोन चित्रपट बनवण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु सुशांतच्या कुटुंबीयांनी हे चित्रपट तयार करण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे सुशांतवर सध्या कोणताही चित्रपट तयार होताना दिसत नाही.

सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांच्या वकिलांनी आधीच सांगितले आहे, की सुशांतच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय सुशांतच्या जीवनावर कोणताही चित्रपट, मालिका किंवा पुस्तक बनवता येणार नाही. जोपर्यंत सुशांतच्या कुटुंबीयांना कोणतीही स्क्रिप्ट दाखवली जात नाही आणि सुशांतचे वडील आणि त्याच्या बहिणी त्याला संमती देत नाहीत तोपर्यंत सुशांतसिंगच्या जीवनावर काही लिहिता किंवा बनवता येणार नाही.

मध्यंतरी सुशांतच्या बायोपिकचा पहिला लूक प्रदर्शित झाला, ज्याला 'शशांक' असे नाव देण्यात आले होते. यामध्ये अभिनेता सचिन तिवारी सुशांतसिंगची भूमिका साकारणार होता, पण चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर सुशांतची बहीण श्‍वेताने सोशल मीडियावर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

- चाहत्यांच्या पदरी निराशा
'सुसाईड' किंवा 'मर्डर' या चित्रपटाच्या घोषणेसह पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले होते. सुशांतच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे, असेही सांगण्यात आले होते. पण सुशांतच्या घरच्यांची परवानगी जोवर मिळत नाही तोवर चित्रपटाचे पुढील कोणतेही काम केले जाणार नाही. त्यामुळे सुशांतच्या बायोपिकसाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख