Maharashtra Governor got first prize in Post Department Letter Writing Competition | Sarkarnama

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. बक्षीसाची ही रक्कम टपाल विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केला आहे.

टपाल खात्याच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 'बापू तुम्ही अमर आहात' (Bapu You Are Immortal) असा या स्पर्धेचा विषय होता. त्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पहिले बक्षिस मिळावले.

या स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० घालून ही रक्कम डाक विभातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख