रिबेरोंना महाराष्ट्र पोलिसांचे भविष्य दिसले होते?

रिबेरो यांनी 'द वायर' वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या ब्लाॅगमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना आवाहन केले होते. केवळ चांगल्या ठिकाणच्या पदांसाठी स्वतःचे स्वातंत्र्य गमवू नका आणि पोलिस दलाची इज्जत धुळीला मिळवू नका, अशी कळकळीची विनंती रिबेरो यांनी या ब्लाॅगद्वारे केली होती.
Julio Ribeiro Had Warned Cops about their misdeeds
Julio Ribeiro Had Warned Cops about their misdeeds

मुंबई :  पोलिस अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना पैशाच्या जीवावर विकत घेऊन गुन्हेगारांच्या टोळ्या उभ्या राहिल्या आहेत. गुन्हेगार, पोलिस आणि राजकारणी यांच्यातल्या या अभद्र युतीतून हे राक्षस जन्माला आले आहेत. राजकारण्यांना आपण आवर घालू शकणार नाही, पण तुम्ही आपल्या हाताखालच्या लोकांना गुन्हेगारांना पाठीशी घालण्यापासून रोखून आपण या अभद्र युतीचा एक पाय निश्चित मोडू शकतो, असे खडे बोल सुपर काॅप ज्युलिओ एफ. रिबेरो (Julio Ribeiro) यांनी गेल्याच वर्षी पोलिसांना उद्देशून सुनावले होते. (Julio Ribeiro Last Year Warned Cops about their misdeeds )

रिबेरो यांनी 'द वायर' वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या ब्लाॅगमध्ये पोलिस (Mumbai Police) अधिकाऱ्यांना हे आवाहन केले होते. केवळ चांगल्या ठिकाणच्या पदांसाठी स्वतःचे स्वातंत्र्य गमवू नका आणि पोलिस दलाची इज्जत धुळीला मिळवू नका, अशी कळकळीची विनंती रिबेरो यांनी या ब्लाॅगद्वारे केली होती. 

उत्तर प्रदेशात गँगस्टर विकास दुबेचे एन्काउंटर झाले. त्यावेळी अस्वस्थ झालेल्या रिबेरोंनी ता. २२ जुलै, २०२० रोजी सध्या सेवेत असलेल्या 'आयपीएस' (IPS) अधिकाऱ्यांना ब्लाॅगच्या माध्यमातून खुले पत्र लिहिले होते. 'सध्या काळ बदलला आहे. राजकीय दबावाची रीतही बददली आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची धोरणे आखणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा आजची राजकारण्यांची जमात वेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला देणार नाही किंवा काही तत्वज्ञानही शिकवणार नाही,' असे रिबेरो यांनी या खुल्या पत्रात म्हटले होते. मात्र ईमानदारी, कामाची निष्ठा, सत्य आणि न्यायासाठी सेवा कायदा व राज्यघटना यांच्याशी असलेले उत्तरदायित्व या गोष्टी कुठलाही निर्णय घेताना तुमच्या समोर हव्यात, असेही रिबेरो यांनी या पत्राद्वारे सुनावले होते.

दहशहतवादाशी जो लढा दिला गेला ती पद्धत आता गुन्हे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी उपयोगी ठरणारी नाही. पोलिस अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना पैशाच्या जीवावर विकत घेऊन गुन्हेगारांच्या टोळ्या उभ्या राहिल्या आहेत. गुन्हेगार, पोलिस आणि राजकारणी यांच्यातल्या या अभद्र युतीतून हे राक्षस जन्माला आले आहेत. हे तुमच्यासह अगदी सामान्य काँन्स्टेबललाही माहित आहे, असेही रिबेरोंनी सुनावले होते. )Julio Ribiero Last Year Warned Cops about their misdeeds )

राजकारण्यांना आपण आवर घालू शकणार नाही, पण तुम्ही आपल्या हाताखालच्या लोकांना गुन्हेगारांना पाठीशी घालण्यापासून रोखून आपण या अभद्र युतीचा एक पाय निश्चित मोडू शकतो, असे रिबेरो म्हणतात. गुन्हेगारांना गुन्हे करु द्या, असे राजकारणी सांगणार नाहीत. पण ते तुम्हाला तुमच्या जागेवरुन हलवून गुन्हेगारांचा अप्रत्यक्ष मुक्तद्वार देऊ शकतील, असे खडे बोल रिबेरो यांनी सुनावले होते. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com