...अशी पटली 'त्या' कारची ओळख; असे केले होते बदल!

वाझेंच्या अटकेनंतर NIA ने मध्यराञी मुंबईच्या पोलिस आयुक्तालयातून CIU पथकातील एक इनोव्हा कार ताब्यात घेतली. ही कार त्या दिवशी स्फोटकं ठेवलेल्या कार सोबत CCTV मध्ये दिसत असल्याचं NIA च्या तपासात समोर आलं. मात्र, कारची ओळख पटू नये म्हणून गाडीत अनेक बदल केल्याचं आता समोर आलं आहे.
NIA Found Ennova Car used in Antellia Bomb Case
NIA Found Ennova Car used in Antellia Bomb Case

मुंबई : अँटीलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंच्या अटकेनंतर या प्रकरणातील तिढा आता NIA च्या अधिकाऱ्यांना सोडवण्यात यश येत आहे. वाझेंच्या अटकेनंतर NIA ने मध्यराञी मुंबईच्या पोलिस आयुक्तालयातून CIU पथकातील एक इनोव्हा कार ताब्यात घेतली. ही कार त्या दिवशी स्फोटकं ठेवलेल्या कार सोबत CCTV मध्ये दिसत असल्याचं NIA च्या तपासात समोर आलं. मात्र, कारची ओळख पटू नये म्हणून गाडीत अनेक बदल केल्याचं आता समोर  आलं आहे.

ही कार मुंबईत आल्यानंतर ती कार मुंबई पोलिसांच्या मोटार दुरूस्ती विभागात पाठवण्यात आली. विधीमंडळात या संशयित कारबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या कारच्या मागे पोलिस लिहिण्यातं आले, कारच्या मागच बंपरला असलेले लोखंडी गार्ड काढण्यात आलं.  सर्वात महत्वाचं म्हणजे सीसीटीव्हीच्या तपासणीत कारचा डॅशबोर्ड, समोरच्या बाजूसं विशिष्ठ बनावट आदी गोष्टींच्या सहाय्याने या कारचा शोध लावण्यात आला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण घटनाक्रम पडताळण्यात आल्यानंतर एनआयए मुंबई पोलिसांची सीआययू वापरत असलेल्या या संशयीत कारपर्यंत पोहोचली. ही कार व त्याची लॉगशीट ताब्यात घेण्यात आले असून त्या संबंधीत चालकांचीही NIA चौकशी करत आहे. 

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले आणि दोन्ही संशयित कारचा शोध सुरू झाला. स्फोटकांनी भरलेली कार ज्या ठिकाणी उभी होती. त्या कारच्या समोरील दुकानातील CCTV मध्ये या दोन्ही कार निदर्शनास आल्या, त्यानंतर मुलुंड टोल नाक्यावर फक्त इनोव्हा कार मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी रोजी ठाण्याच्या दिशेने जाताना दिसली. मात्र, ठाण्यात नंबर प्लेट बदलून ही कार पुन्हा मुंबईत आली. NIA तपासात या कारची ओळख पटू नये म्हणून काही बदल केल्याचं आता समोर आलं आहे.

CIU वापरत असलेल्या इनोव्हा कारच बंपरवर एक डाग होता. हा डाग लपवण्यासाठी एक प्लास्टिकची पांढरी चिकटपट्टी लावली होती. ही गाडी सीसीटिव्ही मध्ये ठाण्यात जाताना दिसत होती. मागच्या गाडीची लाईट त्या गाडीच्या बंपर पडली त्यावेळी काहीतरी चमकलेलं दिसलं. मात्र पुन्हा मुंबईत येताना हीच कार पुन्हा दिसली. मात्र, त्याची नंबरप्लेट बदलेली दिसत होती. त्यावरून या गाडीची ओळख पटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com