त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्या!

शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. बोरिवली पूर्व येथील शांतीवन परिसरातील व्यापारी व घरांना त्याचा फटका बसला. व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी सूचना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
Darekar Pravin
Darekar Pravin

मुंबई : शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. (Raining from saturday evening in Boriwali) बोरिवली पूर्व येथील शांतीवन परिसरातील व्यापारी व घरांना त्याचा फटका बसला. (Traders and houses affected due to heavy rain) व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी सूचना  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. 

बोरिवलीतील या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांच्या नुकसानीची श्री. दरेकर यांनी पाहणी केली. तेथील रहिवाशांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बोरिवलीतून जाणाऱ्या मिठी नदीची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. व्यापाऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी त्यांच्या दुकानाचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  

श्री. दरेकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे बोरिवलीतील मिठी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. नदीकाठी वसलेला शांतीवन परिसर, श्रीकृष्णनगर दरवर्षी जलमय होतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दरवर्षी प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते.  आजही नदीकाठी असलेल्या अनेक झोपडपट्ट्या, सोसायटी आणि दुकानांमध्ये  पाणी साचले आहे. नांगरिकांसहित व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

ते म्हणाले, अगोदरच लॉकडाउनमुळे व्यापारी निराश झाला आहे. त्यात आता मुसळधार पावसामुळे असे नुकसान झाल्यामुळे व्यापारी खचला जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.  

नॅशनल पार्क पुलाचे काम करा
नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलावरून दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडसावले. पुलाचे  काम लवकर लवकर पूर्ण करा, असे निर्देश दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त वेलारासूंसोबत बैठक घेणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे भाजप अध्यक्ष दिलीप उपाध्याय, विक्रम चौघुले, हेमचंद्र नार्वेकर, संजय शिरवडकर, वॉर्ड अध्यक्ष संजय मोरे, लक्ष्मण कदम आदी पदाधिकारी  उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com