कोल्हापूरकरांचा सोमवारही धक्‍कादायकच ः पाच जण पॉझिटीव्ह 

कोल्हापूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 जणांचे कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने धक्का बसलेल्या कोल्हापूरवासियांचा सोमवारही धक्कादायकच उजाडला. मुंबईसह पुण्याहून आलेल्या पाच जणांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले.
Five positive corona patients found in Kolhapur on Monday Morning
Five positive corona patients found in Kolhapur on Monday Morning

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 जणांचे कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने धक्का बसलेल्या कोल्हापूरवासियांचा सोमवारही धक्कादायकच उजाडला. मुंबईसह पुण्याहून आलेल्या पाच जणांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. या पाच जणांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56 वर पोचली आहे. आतापर्यंत यातील 12 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांत एक जण शहरातील राजारामपुरी परिसरात राहणारा आहे. 

रविवारी (ता. 17) पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या 14 जणांत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हजर होण्यासाठी सोलापूरहून आलेल्या महिला डॉक्‍टरचा समावेश आहे. संबंधित डॉक्‍टर महिला सोलापूरहून आल्या होत्या, हा जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने त्यांचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठवला होता, त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. याशिवाय शाहुवाडी तालुक्‍यातील 49 वर्षीय पुरूष, आजरा येथील 42 वर्षीय पुरूष व भुदरगड तालुक्‍यातील 32 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. या सर्वांनी तीन दिवसांपूर्वी मुंबई ते कोल्हापूर प्रवास केला होता. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. काल हे सर्वजण पॉझिटीव्ह आले आहेत. 

आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यात शहरातील राजारामपुरी परिसरातील एकाच समावेश आहे. संबंधित व्यक्ती साताऱ्याहून कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी आली होती. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने ते तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्याचदिवशी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. आज सकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या जवळच्या संपर्कातील दोन मुलांनाही आज ताप आल्याने त्यांनाही सीपीआरमध्ये दाखल करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अन्य चार रुग्णांत दोन रुग्ण आजरा तालुक्‍यातील, तर दोन भुदरगड तालुक्‍यातील आहेत. हे चौघेही मुंबईहून कोल्हापुरात आले होते. 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे 820 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत सुमारे 360 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या 45 दिवसांत सीपीआरमध्ये साडे सतरा हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे. दररोज मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांनी सीपीआरमध्ये तपासणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा मोठा ताण यंत्रणेवर येत आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी तर जिवावर उदार होऊन कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान देत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com