मुख्यमंत्र्यांनी लिहिले राज्यातील जनतेला खुले पत्र

महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजीघेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात केले आहे.
CM Uddhav Thackeray Writes Letter to Maharashtra People
CM Uddhav Thackeray Writes Letter to Maharashtra People

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे.नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असे आवाहन करुन ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात लढलेला कोरोना लढ्याचा थोडक्यात आढावा घेतला असून नवीन वर्षात परिस्थिती कशी असेल याचाही थोडक्यात आढावा घेतला आहे.

या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात....गेल्या वर्षभरात संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहाभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने करोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी करोना काहीश्या प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे, एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.

ते पुढे म्हणतात....पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करत आहोत. आथा आपल्याला मागे परतायचे नाही. करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आथा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे

आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मिती संकटे नेहमीच येतात परंतू त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयासध्याच्या आव्हानात्मक परिस्थीचा अतिशय जिद्धीने सामना करती असलेल्या डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा...असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com